नगर – मल्लखांब हा पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकार आहे. हजार पेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणाऱ्या या खेळातून मुलांच्या शाररिक बरोबरच मानसिक व बौद्धिक विकासात ही हातभार लागतो, आज पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सवच्या निमित्ताने सोहम अकॅडमीच्या मल्लखांब प्रात्यक्षिकाने पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सव २०२३ च्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत,असे प्रतिपादन सोहम अकॅडमीचे संचालक योगेश म्याकल यांनी केले.
येथील मार्कंडेय संकुलातल्या तीन दिवसीय पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ”मल्लखांब प्रात्यक्षिक’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शक्तीच्या सुरेखा विद्ये होत्या. अहमदनगर शहराच्या नागरिकांसाठी मनोरंजन, कला, रुचकर खाद्य पदार्थ ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सव २०२३ मध्ये उपलब्ध आहेत. शहराच्या पर्यटनामध्ये शॉपिंग महोत्सव भर टाकत आहे. कारण लोकल फॉर व्होकल या प्रमाणे स्थानिकांना चांगल मार्केट शॉपिंग महोत्सवानिमित उपलब्ध होत आहे.
पद्मउद्योजक शॉपिंग महोत्सवमध्ये शॉपिंग, खाद्य जत्रे बरोबरच कला, संस्कृती आणि क्रीडा नौपुण्याच्या कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन केलेले आहे. त्यात आज सोहम अकॅडमीचे संचालक – कोच आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल विनर श्री. योगेश म्याकल यांनी योगा, जिमनॅस्टिक चे अतिशय नेत्रदिपक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित नगरकरांची मने जिंकून घेतली. या वेळी मल्लखांब, योगा आणि जिमनॅस्टिक हे आजच्या युवा पिढी ला फार आवश्यक आहे. कारण युवा पिढी च्या शरीरावर स्मार्टफोनच्या अती वापरामुळे विपरीत परिणाम होत आहेत किंवा निराशेच्या गर्तेत जात आहेत. या सगळ्यातून बाहेर पडायचे असल्यास त्याला योगा, जिमनॅस्टिक किंवा मल्लखांब सारख्या क्रीडा प्रकारची नितात गरज आहे असेही पुढे योगेश म्याकल म्हणाले.
नगर शहराच्या मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजू धोत्रे यांनी सोहम एकॅडमी आणि योगेश म्याकल यांचा सन्मान केले आणि नगर शहरातील युवकांनी मल्लखांब या क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन आपल्या नगर शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवावे असे सांगितले.
पुण्याहून खास कार्यक्रम ला उपस्थित असलेले अरुण अमृतवाड आणि जितेंद्र कांचीयानी यांनी मल्लखांब मध्ये सहभागी युवकांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी पद्मशाली युवाशक्तीचे अजय म्याना, सुमित इप्पलपेल्ली, दिपक गुंडू, श्रीनिवास इप्पलपेल्ली, शुभम बुरा, सागर बोगा, योगेश ताटी, पद्मशाली महिला शक्तीच्या सुरेखा विद्दये, सारिका मुदिगोंडा, उमा बडगु, निता बल्लाळ, सुनंदा नागुल, सुनंदा रच्चा, रेणुका जिंदम, सुरेखा कोडम, वैशाली कुरापट्टी, सविता येंनगदुल, वर्षा म्याकल यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्र संचालन नीता बल्लाळ यांनी केले तर आभार उमा बडगू यांनी मानले.