आरोग्य सेवक मच्छिंद्र जावळे सेवानिवृत्त

0

कोपरगाव( वार्ताहर) : संपूर्ण आयुष्यामध्ये वयाच्या साठ वर्षापर्यंत शासकीय नियमानुसार कोणताही कर्मचारी एखाद्या शासकीय विभागात सेवा देऊन निवृत्त होत असतो मात्र कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील मच्छिंद्र बाळाजी जावळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वर्षे सेवा करत शेवटी आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक या पदावर काम केले अखेर ते या पदावरून काल सेवानिवृत्त झाले . कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे महसूल विभागात तलाठी कार्यालयात लिपिक म्हणून जावळे यांनी सोळा वर्ष सेवा केली. ती सेवा करत असताना त्यांनी सोनेवाडी ग्रामपंचायती मध्ये लिपिक म्हणून तब्बल 22 वर्ष काम पाहिले. या पदावर काम करत असताना महाराष्ट्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागाच्या जनतेपर्यंत पोहोचवायचे काम त्यांनी केले. सन 1989 ते 2004 पर्यंत त्यांचे हे काम अविरत चालले होते.महसूल विभागातही प्रामाणिकपणे काम त्यांनी केले. त्यांच्या याच कामाची दखल पुढे घेण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अहमदनगर येथे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना संधी देण्यासाठी 10 टक्के जागांचे रिजर्वेशन देण्यात आले होते. त्यामध्ये सर्व नियम व अटीमध्ये मच्छिंद्र जावळे यांची जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून निवड करण्यात आली. येथेही त्यांनी अतिशय प्रामाणिक काम केले. पोहेगांव प्राथमिक आरोग्य 

केंद्र अंतर्गत काकडी देर्डे कोऱ्हाळे येथे त्यांनी काम केले तर राहता तालुक्यातील सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ही त्यांनी आजतागायत आपली आरोग्य सेवक म्हणून कारकिर्द त्यांनी पार पडली.

 अखेर शासकीय नियमानुसार त्यांना काल सेवानिवृत्त करण्यात आले. वेगवेगळ्या विभागात अनेक वर्ष सेवा केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले आहेत. याची दखल घेत काल त्यांना सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्रातून निरोप देण्यात आला. त्यांचा पत्नी दमयंती जावळे यांच्या समवेत सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीधर गागरे, श्रीमती सुजाता कोनवळे, डॉक्टर मालकर, श्री घोगरे, तय्यब सय्यद, स्नेहल सोनवणे, श्री शिंदे, श्री पैठणे, श्री बिरदवडे, श्रीमती धनवटे, श्रीमती शेख, श्रीमती संसारे, श्रीमती सय्यद, श्रीमती कचवे, श्रीमती भांड, श्रीमती अंञे, अनीता शिरोळे, अश्विनी खकाळे, रोहिणी गरुड ,सुनंदा गरुड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here