आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून अतिरिक्त पॉवर  ट्रांसफार्मरसाठी १० कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर

0

तळेगाव, हिवरगाव पावसा, देवगाव, पिंपरणे, निंबाळे व रहिमपूरचा समावेश

संगमनेर  : १७१ गावे व २५० वाडीवस्ती आणि विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या योजना राबवून हा तालुका राज्यात आदर्शवत बनवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत राबवलेल्या निविदा प्रक्रियेतून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर साठी १० कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत  थोरात यांनी दिली.
          नवीन अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरला मिळालेल्या निधीबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अविश्रांत कामातून तालुका विकासाचे मॉडेल बनवला आहे. संगमनेर हा सहकार,शिक्षण,कृषी आर्थिक समृद्धी याबाबत इतर तालुक्यांना दिशादर्शक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडेच्या कालव्यासाठी भरीव निधी मिळवण्याबरोबरच तालुक्यातील रस्त्यांसह, पाणीपुरवठा योजना व इतर कामांसाठी आमदार थोरात यांनी भरीव निधी मिळवला होता.महाविकास आघाडी सरकारच्या कृषी ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत तालुक्यातील ऊर्जा विषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी तळेगाव दिघे, हिवरगाव पावसा,देवगाव, पिंपरणे, निंबाळे व रहिमपूर या गावांकरता  ३३ के.व्ही 33, एमव्हीए अतिरिक्त पावर ट्रान्सफरसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी १० कोटी ४० लाख रुपयांचे निधीसाठी पाठपुरावा केला होता.नुकताच हा निधी मंजूर झाला आहे.नव्याने मंजूर झालेल्या या निधीतून अतिरिक्त पावर ट्रांसफार्मर मिळणार असल्याने या गावांना जोडणाऱ्या गावांसाठी वीजपुरवठा सुरळीत होऊन पूर्ण दाबाने मिळण्यास मोठी मदत होणार आहे.यामुळे तळेगाव, हिवरगाव पावसा, देवगाव, पिंपरणे, निंबाळे व रहिमपूर येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व गावांमधील शेतकरी व नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here