ओडिशातील बालासोरच्या भीषण रेल्वे अपघातात आकडा २८८ प्रवाशांचा मृत्यू तर जवळपास ८०० हुन अधिक जखमी

0

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कोलकात्यानजिकच्या हावडा रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी (२ जून) सायंकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील प्रवाशांच्या प्रवाशांचा मृत्यूचा आकडा २८८ वर पोहचला असून जवळपास ८०० हुन अधिक प्रवाशी जखमी झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाख रुपयांची मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख तर किरकोळ जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.

तामिळनाडूहून निघालेल्या , कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे घसरून बाजूने येणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्सप्रेस आणि एका मालगाडीलाही धडकले. अशा प्रकारे एकूण तीन रेल्वेंची एकमेकांना धडक बसून झालेल्या या विचित्र अपघातात मोठी जीवितहानी झाली आहे.

या अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे, तर गंभीर जखमींची संख्या ५६ आणि किरकोळ जखमींची संख्या ८०० च्या जवळपास असल्याची दक्षिण-पूर्व रेल्वेनं ही माहिती दिली.
मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात आली आहे.
जखमींवर जवळच्या गोपालपूर आणि बालासोर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. तसेच जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली . त्यांच्याबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .

हा अपघात तीन गाड्यांचा मिळून झाला आहे. रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सुब्रत यांच्याशी बोलताना सांगितलं, “शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे 10 डबे ओडिशातल्या बालासोर जवळच्या बाहानगा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन घसरले. हे डबे बाजूच्या रुळावरुन जाणाऱ्या यशवंतपूर हावडा ट्रेनला जाऊन धडकले. यामुळे यशवंतपूर-हावडा ट्रेनचे काही डबेही घसरले. हे डबे घसरल्यानंतर जवळच्या एका मालगाडीला जाऊन आदळले”.

दरम्यान “बालासोर मेडिकल कॉलेज, एससीबी मेडिकल कॉलेज, बालासोर जिल्हा रुग्णालय आणि भद्रक जिल्हा रुग्णालय यांच्या तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत जेणेकरुन जखमींवर लवकरात लवकर उपचार सुरू होतील”, अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलंय.

कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचं वृत्त ऐकून दुःख झालं. या घटनेच्या माहितीसाठी आम्ही ओडिशा सरकार आणि दक्षिण-पूर्व रेल्वे प्रशासनासोबत सातत्याने संपर्कात आहोत. या अपघातानंतर लागणाऱ्या मदतीसाठी आम्ही एक पथक पश्चिम बंगालवरून पाठवत आहोत. मी आणि राज्याचे मुख्य सचिव या प्रकरणावर बारीक नजर ठेवून आहोत, असं त्या म्हणाल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं .

“बालासोर, ओडिशा येथील रेल्वे अपघाताच्या वृत्ताने मन व्यथित झाले. अपघातात जीव गमावलेल्या लोकांप्रति श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना,” असं ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here