ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात

0

एक्सप्रेस मालगाडीला धडकल्याने झाला अपघात ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातील बहानागा रेल्वेस्थानाच्या जवळ ही दुर्घटना घडली आहे.शालिमारहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे.

बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती स्पेशल रिलीफ कमिशनर ऑफिसने दिली. बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही बचावकार्याच्या दृष्टीने आवश्यक आदेश जारी केले आहेत. दक्षिण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही कोच रुळावरून घसरले आहेत.

ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि  मालगाडी यांचा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती आहे. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे.

बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात झालेली धडक इतकी भीषण होती की, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून उतरली. या अपघातात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, एक्स्प्रेसचे डब्बे पलटल्याने काही प्रवासी अडकले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. 

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे रुळावरून डब्बे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी, एका रुळावर दोन गाड्या कशा आल्या याचा तपासही रेल्वेने सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here