संत ज्ञानेश्वर उद्यानाला जागतिक दर्जा मिळवून देऊ : रोहयो तथा छत्रपती संभाजीनगर चे पालकमंत्री भुमरे.

0

लवकरच उद्यान पर्यटकांसाठी खुले होईल व्यापारी,पर्यटक वर्गात आनंदी वातावरण.

पैठण,दिं.२०(प्रतिनिधी) :  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत असलेल्या जगप्रसिद्ध पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांचा भुमिपुजन कार्यक्रम राज्याचे रोहयो तथा पालकमंत्री  संदिपान पाटील भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले . 

       यावेळी राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण , महानंद राज्य संचालक नंदलाल पाटील काळे, कडाचे अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार , कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव, उपविभागीय अधिकारी दिपक डोंगरे, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण,शाखा अभियंता तुषार विसपुते, शाखा अभियंता बंडू अंधारे, शेलार, शेळके,माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी,काॅट्रॅक्टर संजय भंडारी,म्युझिक फांऊटनचे काॅट्रॅक्टर श्री पटेल, माजी नगरसेवक बाळासाहेब माने,उद्योजक श्री बांगर, प्रगतशिल युवा शेतकरी प्रशांत जगदाळे, सोसायटी चेअरमन शाम पाटील काळे, युवानेते शेखर शिंदे, राजेश मानधने याची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी मंत्री भुमरे यांनी यावेळी बोलताना सां कितले कि संत ज्ञानेश्वर उद्यानाला जागतिक लेवलचा दर्जा कसा मिळेल या कडे लक्ष देवून चाळीस वर्षांपूर्वी जसे उद्यान होते तसेच करण्यात येईल तसेच या ठिकाणी जागा भरपूर असल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना ईथेनिवासी व्यवस्था हि करणार असुन सध्या पुर्वीसारखे उद्यान पहायला खुले केले जावुन पैठण च्या पर्यटकात नक्कीच भर पडुन ईथला व्यापार वाढेल , असे मनोगत व्यक्त केले . यावेळी संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विविध विकास कामे प्रत्यक्षात सुरू झाल्याने सध्या रस्ते , पार्किंग , पाईपलाईन , संगीतकारंज्याचे  पहील्या टप्प्यात कामे होणार असुन पुढील निधीसाठी प्रयत्न करून दुसर्या टप्प्यात उर्वरित कामे करून दिवाळी पुर्वी संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकासाठी नक्कीच खुले करण्यात येईल पैठण कराच्या वतीने पैठण शहर व्यापारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष पवन लोहीया , बलराम लोळगे , जगदीश लोहीया , तसेच उद्यान बचाव समिती तर्फे प्रा . संतोष गव्हाणे , बाळासाहेब आहेर यांनी पालकमंत्री भुमरे यांचे स्वागत करून अभार मानले.

 यावेळी मुंबई महानंदचे संचालक नंदलाल पाटील काळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजुनाना भुमरे , माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी , रवींद्र शिसोदे , संजय पापडीवाल, विजय पापडीवाल ,माजी नगराध्यक्ष शहादेव लोहारे , शिवसेना युवानेते शेखर शिंदे , युवासेनेचे किशोर चौधरी पाटील, ईनरव्हिल क्लबच्या सौ लोखंडे , ज्योतीताई पठाडे , जनार्दन मिटकर , पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील उगले , पैठण तालुका व्यापारी महासंघाचे सचिव रामेश्वर सुसे,ज्ञानेश्वर गोरे, मनिष औटे,उमेश तट्टू पाटील सह आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here