चांदेकसारे न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल 83.23%

0

अचला वैभव होन 94% मार्क मिळवून प्रथम

सोनेवाडी (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भारत सर्व सेवा संघ पाचेगाव संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे विद्यालयाचा निकाल काल जाहीर झाला असून विद्यालयाचा एकूण निकाल 88.23 टक्के लागला आहे.विद्यालयातील विद्यार्थिनी  होन अचला वैभव हिला 500पैकी 470 मार्क मिळाले असून ती 94% गुण मिळवत विद्यालयात प्रथम आली आहे .

होन प्रथमेश याला 500 पैकी 465 गुण मिळाले असून  93% मिळवत त्याने दुसरा नंबर मिळवला आहे. होन श्रद्धा राजेश हिला 500पैकी 459 गुण मिळाले असून  91.80% मिळवत तीने तिसरा क्रमांक तर होन साई राजेश याला 500 पैकी 457 गुण मिळाले असून 91.40 टक्के मिळवल्याने विद्यालयात चौथा क्रमांक पटकावला आहे.दहावीच्या परीक्षेसाठी 102 विद्यार्थि बसले होते त्यापैकी 90 विद्यार्थी पास झाले आहेत.

मध्ये डिस्टिंक्शन – 30,फर्स्ट क्लास – 26 ,सेकंड क्लास – 28,पास क्लास – 6 या श्रेणीत आले असून 12 विद्यार्थी नापास झाले आहेत.एकूण रिझल्ट- 88.23 लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, सुनील होन आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here