जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी गोरक्षनाथ जामदार

0
फोटो ओळ - कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी गोरक्षनाथ जामदार यांची तर व्हा.चेअरमनपदी सुभाष सोनवणे यांच्या निवडी प्रसंगी त्यांचा सत्कार करतांना आ.आशुतोष काळे समवेत सुधाकर रोहम व संचालक मंडळ.

व्हा.चेअरमनपदी सुभाष सोनवणे यांची बिनविरोध निवड

कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी गोरक्षनाथ ज्ञानदेव जामदार यांची तर व्हा.चेअरमनपदी सुभाष भास्करराव सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीची सन २०२३-२०२८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संस्थचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली असून संस्थेच्या नूतन चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी ए.आर.रहाणे यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी चेअरमनपदाच्या नावाची सूचना महेश लोंढे यांनी मांडली त्या सूचनेस पाराजी गवळी यांनी अनुमोदन दिले. तर व्हा.चेअरमनपदाच्या नावाची सूचना गणेश गायकवाड यांनी मांडली व त्या सूचनेस नानासाहेब चौधरी यांनी अनुमोदन दिले. यावेळी सर्व सदस्यांच्या अनुमतीने चेअरमनपदी  गोरक्षनाथ जामदार यांची तर व्हा.चेअरमनपदी सुभाष सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी जाहीर केले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, नवनिर्वाचित संचालक सचिन आव्हाड, गणेश गायकवाड, पाराजी गवळी, नानासाहेब चौधरी, संदीप  शिंदे, नानासाहेब निकम, महेश लोंढे,  संजय संवत्सरकर, शंकर गुरसळ, सौ.विमलबाई गवारे, सौ.कांताबाई दहे उपस्थित होते. निवडणुककामी संस्थेचे  जनरल मॅनेजर सुरेश काशिद यांनी सहकार्य केले.

 नवनिर्वाचित चेअरमन गोरक्षनाथ जामदार, व्हा.चेअरमन सुभाष सोनवणे यांचे माजी आमदार अशोकराव काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आल. त्याचबरोबर सर्व संचालक मंडळाने देखील अभिनंदन करून नवनिर्वाचित चेअरमन,व्हा.चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल गोरक्षनाथ जामदार म्हणाले की, माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमनपदी पुन्हा निवड करून टाकलेला विश्वास सार्थ ठरवु. संस्थेला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर घेवून जाण्यासाठी संस्थेचे व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here