डी.के मोरे विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारली १८१ क्रमांकाची प्रतिकृती

0

संगमनेर : सह्याद्री संस्थेचे डी.के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पान येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

       प्राचार्य भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार “मिशन शक्ती “या एक छत्री योजनेतील सबल महिलांची सुरक्षा व संरक्षण या उपायोजनाअंतर्गत राज्यातील संकटग्रस्त व पीडित महिलांना तातडीने आवश्यक ती मदत मिळण्यासाठी १८१ टोल फ्री मुख्यमंत्री महिला हेल्पलाइन मदत वाहिनी सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. या हेल्पलाइनबद्दल प्रचार व प्रसार व्हावा  या सामाजिक जाणिवेतून विद्यालयांमध्ये ७०० मुलींची मानवी साखळी व ७५० विद्यार्थी व रांगोळी यांच्या साह्याने १८१ ही प्रतिकृती तयार करण्यात आली.ही संकल्पना विद्यालयातील कला शिक्षक सत्यानंद कसाब व क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर यांनी साकारली.  त्यांना  प्रा भिमराज काकड, भारत सोनवणे.सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

रांगोळी काढण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी वैभव थोरात , जागृती थोरात  यांनी सहकार्य केले.यावेळी प्राचार्य भाऊसाहेब शिंदे यांनी आपल्या प्राचार्य संदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी महिलांवर अत्याचार घडतात महिलांना असुरक्षित वाटायला लागले आहे.  याचा विचार करून केंद्र शासनाने अशा संकटग्रस्त, पीडित महिलांसाठी ही मदत वाहिनी सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. आपल्या भारत देशात महिलांना आदराचे स्थान दिलेले आहे त्यामुळे सर्वांनी महिलांकडं चांगले नजरेने बघितलं पाहिजे. सर्व तरुण विद्यार्थ्यांनी प्रत्येक मुलीकडे बहिण या नात्याने पाहिले पाहिजे व तिचे संरक्षण केलं पाहिजे असे आवाहन केले. विद्यालयातील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ध्वजास मानवंदना दिली.तसेच वडगाव पान मधील भगतसिंग मित्र मंडळ यांच्यातर्फे सर्व शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यालयातील थोरात कोमलता हिची  ४०० मीटर हर्डल्स या स्पर्धेमध्ये राज्य पातळीवर निवड झाली त्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्रीमती  लता पवार, प्रा.बाबा  गायकवाड व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गावातील  ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दये पि.के यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here