डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीने गुणवत्ता सिद्ध केली – प्रा.सुनिल कल्हापुरे

0
फोटो - विळद घाट येथील डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅशनल बोर्ड ऑफ अक्रीडीटेशन मानांकन मिळाले. या कमिटी सदस्यांचे स्वागत करतांना डॉ.खा.सुजय विखे पाटील. (छाया : विजय मते)

विखे पाटील अभियांत्रिक महाविद्यालयास नॅशनल बोर्डाचे मानांकन

     नगर – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महाविद्यालयातील अद्यावत प्रयोगशाळा, उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग, आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर, विद्यापीठ परीक्षांचे निकाल त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता घेण्यात येणारे विविध उपक्रम जसे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, संभाषण कला, मुलाखत कौशल्य, तांत्रिक पेपर सादरीकरण, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आधुनिक विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन याचा विचार कमिटी कडून करण्यात आला. यामुळे नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रीडीटेशन (एनबीए) न्यू दिल्ली कमिटीचे मानांकन मिळाल्याने डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध केली, असे प्रतिपादन तंत्र उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे यांनी केले.

     नवीदिल्ली येथील एन.बी.ए.च्या कमिटीने या महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या विभागाचा तीन दिवस सर्वेक्षण करुन या विभागातील पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर, प्रभावी शिक्षण प्रणालीचा उपयोग अत्यंत योग्य प्रकारे होत असल्याचे महाविद्यलायाला मानांकन प्राप्त झाले. याबद्दल एनबीए कमिटी समोर प्रभावीपणे व उत्कृष्टपणे  सादरीकरण केल्याबद्दल सिव्हिल इंजिनिअरिंग चे विभाग प्रमुख डॉ. सौ. उर्मिला कवडे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख डॉ. अनिता पाटील तसेच एन बी ए कॉर्डिनेटर डॉ. रवींद्र नवथर या सर्वांचा सन्मान कल्हापूरे व प्राचार्य डॉ. नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

  कल्हापुरे पुढे म्हणाले, फौंडेशनचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी यांचे महाविद्यालयाच्या नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा पुरविणे, पायाभुत सुविधा, शिक्षण संसाधने, अद्यावत प्रयोगशाळा आदि सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे, त्यांच्या कला-गुणांना वाव मिळतो, असे सांगितले.

     यावेळी प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी सांगितले की अभ्यासक्रमाचे विविध पैलू शिकविण्याची व शिकण्याची आधुनिक पद्धत संशोधनातील नवीनता व त्याचा विस्तार महाविद्यालयातील पायाभूत सुविधा तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातील कंपन्यांमधील विद्यार्थ्यांची ट्रेनिंग तसेच सामंजस्य करार या बाबींचा विचार या कमिटीने मानांकन देताना केला असल्याचे सांगितले.

     संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, संचालक खा.डॉ.सुजय विखे पाटील, विश्वस्त  वसंतराव कापरे,संचालक डॉ.अभिजित दिवटे,  प्रभारी सेक्रेटरी डॉ.पी.एम. गायकवाड आदिंनी महाविद्यालयास एन.बी.ए. मानांकन मिळल्याबद्दल प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्कृष्ट कामगिरी पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here