पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा सेमी माध्यम १००% तर मराठी माध्यमाचा ९६.००% निकाल

0

सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा मार्च-२०२३ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल सेमी माध्यम १००% व मराठी माध्यम ९६.००% लागला . प्रथम क्रमांक कुमारी मोहिनी पोपट जाधव ८८.२०%,व्दितीय क्रमांक कुमारी ऋतुजा धनंजय रेवगडे ८७.२०%,तृतीय क्रमांक कुमारी- सुप्रिया सुनिल रेवगडे ८६.८०%,तृतीय क्रमांक-कुमारी सलोनी संजय रेवगडे -८६.८०%,चौथा क्रमांक कुमारी पायल गणेश शिंदे -८५.६०%,पाचवा क्रमांक-कुमार कृष्णा सुदाम रेवगडे ८४.४०% या सर्व विद्यार्थ्याचे बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे,उपाध्यक्ष प्रा. टी.एस.ढोली, संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख, सहसचिव अरुणभाऊ गरगटे, कोषाध्यक्ष टी.के.रेवगडे या सर्वांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
विद्यालयाची ही एकोणतीसावी बँच प्रविष्ट केली होती त्यामध्ये एकूण ४८ विद्यार्थी प्रविष्ट होऊन १६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले,२३ विदयार्थी प्रथम श्रेणी व ७ विद्यार्थ्यांनी व्दितीय श्रेणीत यश संपादन केले.

या सर्व गुणी विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले . या सर्व विद्यार्थ्याचे बी.आर.चव्हाण,आर.व्ही. निकम,एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी, एम.सी.शिंगोटे,एम.एम.शेख,सविता देशमुख, टी.के.रेवगडे,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली, ए.बी.थोरे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here