राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम

0

देवळाली प्रवरा /  प्रतिनिधी :

                  राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2022 23 चा इयत्ता बारावीचा उत्कृष्ट निकाल असलेली परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. महाविद्यालयाच्या कला शाखेतील व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी यावर्षी उत्कृष्ट यश संपादन केले असून, शास्त्र शाखेत यावर्षी १११विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले होते हे सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी पास झाले असून त्यामुळे शास्त्र शाखेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. यामध्ये  कु. शिंदे आदिती सम्राट ८४.८३ , कु. काळे गौरी गोरक्षनाथ ७२.८३ , चि.मुलमुले मयूर बाळासाहेब ७१.८३ या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. विशेष गोष्ट म्हणजे ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे, 

               कला शाखेतील एकूण ७३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले असता ५६ विद्यार्थी पास झाले असून कला शाखेचा निकाल शेकडा ७८ टक्के आहे यामध्ये चि. श्रीराम अजिंक्य नवनाथ ७८.८३,  पटारे संतोष साईनाथ ७०.०० टक्के, भिंगारदिवे जयेश अंबादास ६७ % गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आहे

                   या सर्व या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मनोजशेठ बिहाणी, सह सचिव अनुपशेठ बिहाणी, प्राचार्य  कैलास अनाप,उपमुख्याध्यापिका मंजिरी देशपांडे मॅडम पर्यवेक्षक रंगनाथ पवार व सर्व प्राध्यापक वृंदांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here