विधानसभा निवडणूक ना.नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालीच लढवा : विजय वहाडणे

0

कोपरगाव :
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जर निर्विवादपणे बहुमत मिळवायचे असेल तर गडकरींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढविल्या जाव्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे. वहाडणे यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की संपुर्ण देशभर ज्यांनी महामार्गांचे,रस्त्यांचे जाळे उभे करून दळणवळण सुलभ केले त्या ना.नितीन गडकरींची लोकप्रियता निर्विवादपणे वाढलेली आहे.आजही दररोज सरासरी ३५ कि.मी.नवीन महामार्ग उभारले जाताहेत. खेड्यापाड्यांना महानगरांशी तर जोडलेच पण थेट देशाच्या सीमेपर्यन्त रस्यांचे जाळे तयार केल्याने ना.गडकरींना सर्वसामान्य जनतेत व त्याचप्रमाणे सर्व पक्षातही मान्यता असल्याचे अनेक प्रसंगी देशाने अनुभवले आहे.
नवमतदारांनाही त्यांचे व त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचे आकर्षण आहे.सहकार-शेती-जल संवर्धन असा सर्वांगिण विचार करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.अनेक भाषांवर प्रभुत्व असूनही त्यांच्या भाषणांत कधीही विषारी किंवा टोकाचे कटू वक्तव्य चुकूनही नसते.
आजच्या कलुषित राजकिय वातावरणात ना.गडकरी साहेबांची महाराष्ट्र राज्याला गरज आहे. ते जरअसतील तर गटबाजीला, राजकीय हेव्यादाव्यांना मूठमाती मिळून जुने नवे सर्वच कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागतील. खरे तर ना.नितीन गडकरी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत.पण भाजपाची व महाराष्ट्राच्या राजकारणातील गरज म्हणून तरी त्यांनाच या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आणले तर संपूर्ण राज्यातील वातावरणच बदलून जाईल यात कुठलीही शंका नाही.
केवळ पक्षहितासाठी आपण अशी मागणी करत आहे.ते केंद्रीय नेते असले तरी आज त्यांची महाराष्ट्र भाजपा व महाराष्ट्राला गरज आहे.ना देवेन्द्र फडणवीसही त्याच तोलामोलाचे आहेत.पण ना.नितीन गडकरी असतील तर निवडणूक जास्त सोपी होईल.ना.फडणवीसही मोठ्या मनाने मान्यता देतीलच याचा सर्वांनाच विश्वास वाटतो.कारण पक्षासाठी, राष्ट्रहितासाठी त्याग केलाच पाहिजे असे ते नेहमीच आग्रहपूर्वक सांगत असतात.
महाराष्ट्रात पुन्हा भाजपा व शिवसेना(शिंदे) यांचीच सत्ता आणायची असेल तर पक्षश्रेष्ठींनी या मागणीचा विचार करायला हवा. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही अशाच प्रकारची मागणी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे करावी असेही आवाहनही वहाडणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here