वेस येथील काळे गटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश 

0

कोपरगांव- दि. २५ जानेवारी

            युवकांनी संघटनात्मक बांधणीतुन गावचे प्रश्व सोडवावे, भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटन इंडियाच्या माध्यमातुन युवा शक्तीला विकासप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. 

            तालुक्यातील वेस सोयगांव येथील काळे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा मंगळवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम होते. 

             याप्रसंगी सर्वश्री तान्हाजी श्रीपती पाडेकर, रामनाथ निवृत्ती पाडेकर, काशिनाथ बाबासाहेब पाडेकर, बाबासाहेब बळवंत पाडेकर, दादासाहेब त्रंबक पाडेकर, शांताराम सारंगधर पाडेकर, रविंद्र उत्तम पाडेकर, प्रदिप सोमनाथ पाडेकर, आबासाहेब रामनाथ पाडेकर, दिलीप गोपिनाथ पाडेकर, विकास नवनाथ पाडेकर, नितीन कचरू पाडेकर, नामदेव कचेश्वर म्हाळसकर, शकीलभाई बशीरभाई इनामदार, मच्छिंद्र नामदेव पाडेकर, मच्छिंद्र सोपान आरणे, सचिन कचरू पाडेकर, दुर्गेश काशिनाथ पाडेकर, भिमा खंडु खडीझोड, दत्तात्रय किसन भडांगे, मारूती सोपान पाडेकर, मच्छिंद्र त्रंबक कोल्हे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा सत्कार करण्यात आला.

          याप्रसंगी नवनाथ आरणे, शिवाजी शेंडगे, भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पाराजी औताडे, कैलास राहणे, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी त्यांच्या भाषणातुन सध्याच्या लोकप्रतिनिधींनी या भागातील अकरा गावांच्या समस्याना केराची टोपली दाखवुन फक्त बोलघेवडेपणाचा टेंभा मिरविला अशी टिका केली. 

        विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे सामाजिक शैक्षणिक सहकार कृषी सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे आदर्श व्यक्तीमत्व होते त्यांनी आम्हा तरूणपिढीसाठी ज्येष्ठ श्रेष्ठ विश्वासू आणि तळागाळात काम करणा-या विश्वासु कार्यकर्त्यांचा संपत्ती संच दिला. मतदार संघात असंख्य प्रलबित प्रश्न आहेत त्याच्या सोडवणुकीसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान संघटन कौशल्याचे पाठबळ सतत आपल्या पाठीशी आहे. येणारा पुढचा सगळा काळ हा निवडणुकांचा आहे. रोटी कपड़ा मकान याची सोडवणुक बहुतांष प्रमाणांत झाली असून वीज रस्ते पाणी आणि या भागातील जिरायती शेतक-यांच्या दारात निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे आणण्याचे काम अंतिम टप्यात आहे. 

          धोंडेवाडी पाझर तलाव, काकडी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, अतिवृष्टी अनुदान, रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, अकरा गावात विहीरी खोदाईतील अडचणी यासह असंख्य प्रश्न तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मार्गी लावले, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी निळवंडे धरण कालवे निर्माती संघर्षात आजवर मोठे योगदान दिले असुन त्यांचा पाठपुरावा, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे फडणवीस सरकारचे आर्थीक पाठबळावर शेतक-यांचे स्वप्न साकारले जात आहे. पण समाज माध्यमातून फसवेगिरी  बाजारूपणांला उत आला आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी शेती महामंडळाच्या जागेवर कोपरगांव एम आय डी सी साठी प्रयत्न सुरू असुन ग्रामिण भागात सर्वप्रथम संजीवनी बीपीओ कॉल सेंटर सुरू करून ९६० सुशिक्षीत बेरोजगांराना नोक-या उपलब्ध करून दिल्या आहेत. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना ग्रामिण अर्थकारणाची कामधेनु असुन सहकाराच्या माध्यमातुन असंख्य संस्था उभ्या करून मोठया प्रमाणात रोजगार निर्माण झाला. भारतीय जनता पक्षात ज्या युवकांनी प्रवेश केला त्यांचे स्वागत असेही ते शेवटी म्हणाले.

           याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, अरूणराव येवले, संजय रोहमारे, आप्पासाहेब रोहमारे, नानासाहेब गव्हाणे, रमेश औताडे, एकनाथ दरेकर, गणेश नेहे, कानिफ गुंजाळ, चांगदेव पाडेकर, प्रभाकर गोसावी, राजेंद्र कोल्हे, रामदास भडगि, सुमित कोल्हे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी प्रतिनिधी भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन आभार बाबासाहेब नेहे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here