श्री महिपती महाराज यांच्या ५७ व्या नारळी फिरता अखंड हरिनाम सप्ताहास ८ एप्रिलपासून प्रारंभ !

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                  प्रतिपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत चरित्रकार, संत कवी श्री महिपती महाराज यांच्या ५७ व्या नारळी फिरता अखंड हरिनाम सप्ताहास व भक्तीविजय ग्रंथ पारायणास तसेच संत महिपती पादुका पालखीरथ दर्शन सोहळा-ताहाराबाद पंचक्रोशी (संपूर्ण राहुरी तालुका) परिक्रमास शनिवार दि.८ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याची सांगता सोमवार दि.१७ एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे होईल. यावेळी तालुक्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी केले आहे.

              महिपती महाराजांचा फिरता अखंड हरिनाम सप्ताह व दैनंदिन भक्तीविजय ग्रंथ पारायण सोहळा भाविकांच्या उपस्थितीत चैत्र वद्य द्वितीया ते द्वादशी या महापर्वणीत होणार आहे. संत महिपतींच्या वाड्मयाची पारायणे व किर्तन महोत्सव गावोगावी व्हावे, महिपतींच्या कार्याचा प्रचार व प्रसार होण्यासाठी व सर्वांनी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न करावा, हा उद्देश मनीमानसी धरून वै. ब्रह्मलीन धनाजीबाबा गागरे यांच्या संकल्पनेतून प्रारंभित झालेला फिरता अखंड हरिनाम सप्ताह बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान समिती, पायी दिंडी सोहळा समिती, ग्रामस्थ व संपूर्ण राहुरी तालुकावाशीयांच्या वतीने आयोजित भाविकांच्या उपस्थितीत देवदुर्लभ सप्ताह व परिक्रमा महोत्सव अत्यंत हर्षउल्लासात संपन्न होणार आहे.

        श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे महिपतींच्या समाधीस अभिषेक करून दि.८ एप्रिल रोजी सकाळी ८वा. प्रस्थान होणार आहे. नंतर परिक्रमा सोहळा दरडगाव, म्हैसगाव, चिखलठाण मार्गे शेरी मुक्कामी.दि.९ एप्रिल रोजी खांबा, कोळेवाडी, वाबळेवाडी, कणसेवाडी, वरशिंदे, कानडगाव, तुळापूर मार्गे निंभेरे येथे मुक्काम.

दि.१० एप्रिल रोजी डुकरेवाडी, सात्रळ, धानोरे, रामपूर, कोल्हार, चिंचोली, पिंपळगांव फुणगी, गंगापूर, तांदूळनेर मार्गे तांभेरे मुक्कामी.दि.११ एप्रिल रोजी वडनेर, कनगर, चिंचविहिरे, गणेगांव, गुहा, कारखाना मार्गे देवळाली मुक्काम.दि.१२ एप्रिल रोजी दवणगाव, आंबी, संक्रापूर, केसापूर, बेलापूर, करजगाव, जात, लाख, त्र्यंबकपूर, टाकळीमिया, मुसळवाडी, महाडूकसेंटर, मालुंजे, पाथरे, खुडसरगाव, शेनवडगाव मार्गे कोपरे मुक्कामी.दि.१३ एप्रिल रोजी तिळापुर, वांजुळपोई, मांजरी, वळण, मानोरी, आरडगाव, तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, केंदळ मार्गे केंदळ खुर्द मुक्कामी.दि.१४ एप्रिल रोजी उंबरे, ब्राह्मणी, चेडगाव, मोकळ-ओहोळ, कुक्कडवेढे, मोरवाडी, मोरेचिंचोरे मार्गे वांबोरी मुक्कामी.दि.१५ एप्रिल रोजी सडे, गोटुंबे आखाडा, तमनर आखाडा, देसवंडी, पिंपरी अवघड, विद्यापीठ, खडांबे, धामोरी मार्गे वरवंडी मुक्कामी.दि.१६ एप्रिल रोजी बाभुळगाव, डिग्रस, राहुरी, बारागाव नांदूर, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, गडदे आखाडा, चिंचाळे मार्गे गाडकवाडी मुक्कामी. दि.१७ एप्रिल रोजी सकाळी ९वा. ताहाराबाद क्षेत्री परिक्रमा सोहळ्याची भव्य मिरवणूक, काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल.

        परिक्रमा सोहळ्यातील अश्व, सनईताफा, रथ, वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगव्या पताका, टाळ -मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा- तुकोबाचा जयघोष व एकनाथ महिपती महाराज की जय! हा अविस्मरणीय क्षण ठरणार आहे! सोहळ्याचे ५७वे वर्ष व संत महिपती हस्तलिखित, ५७ अध्यायाचा भक्तीविजय ग्रंथाचे पारायण हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल! चैत्र महिन्याचे रखरखीत उन्ह, भाविकांचा प्रचंड प्रतिसाद व राहुरी तालुक्याची परिक्रमा ही सोहळ्याची वैशिष्ट्ये ठरणार आहे!दैनंदिन कार्यक्रमांमध्ये काकडा भजन, अभिषेक, पुजा व आरती, नैवेद्य, प्रवचन, हरिपाठ व रात्री कीर्तन आदीं कार्यक्रम होणार आहेत. तरी ह्या अन्नदान व ज्ञानयज्ञात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

 चौकट

श्री संत कवी महिपती महाराज मंदिर जीर्णोद्धाराचे व कळसाचे काम चालू आहे, तरी भाविकांनी सढळ हाताने मदत केल्यास मंदिराचे काम लवकर होईल.

     –  बाळकृष्ण महाराज कांबळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here