संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ८ अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू ३. ५ लाख ते रू ५ लाखांवर निवड

0

संजीवनीच्या अभियंत्यांना कंपन्यांची अग्रक्रमाने पसंती
कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या टेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारने एसीई मायक्रोमॅटीक मशिन टुल्स, थायझेनक्रुप, फिन्स सोल्युशन्स प्रा. लि. व ब्रीजस्टोन इंडिया प्रा. लि. या कंपन्यांनी अंतिम वर्षातील अभियंत्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन ८ नवोदित अभियंत्यांची वार्षिक  पॅकेज रू ३. ५ लाख ते रू ५ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. अनेक नामांकित कंपन्या संजीवनीच्या नवोदित अभियंत्यांची अग्रक्रमाने निवड करीत असल्याने पालक आणि विध्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे, अषी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की एसीई मायक्रोमॅटिक मशिन टुल्स या कंपनीने तेजस कडू हेळुदे व प्रसाद सुरेश  दुशिंग  यांना प्रत्येकी वार्शिक पॅकेज  रू ५ लाखांचे नेमणुक पत्र दिले आहे. अश्विनी बाबासाहेब म्हसरूप व आरती रविंद्र निकम यांची फिन्स सोल्युशन्स कंपनीने प्रत्येकी वार्षिक पॅकेज रू ४ लाखांवर निवड केली आहे. थायझेनक्रुप कंपनीने सिध्देश  विष्णू कामभिर, वरूण अनिल शेळके  व श्रध्दा नवनाथ दहातोंडे यांची प्रत्येकी वार्षिक  पॅकेज रू ४ लाखांवर निवड केली आहे, तर ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि. कंपनीने गौरी मच्छिंद्र सातपुते हिची वार्षिक पॅकेज रू ३. ५ लाखांवर निवड केली आहे. हे सर्व विध्यार्थी ग्रामिण भागातील असुन त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
इंजिनिअर झाल्यावर नोकरी मिळते का? असा प्रश्न  अनेक पालकांच्या मनात असतो. परंतु आपल्या पाल्याला  कोणत्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये दाखल करतो, याला खुप महत्व आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज हे उत्तर महाराष्ट्रातील  एकमेव ‘ऑटोनॉमस’ दर्जा प्राप्त कॉलेज आहे आणि या दर्जामुळे कॉलेजला आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अभ्यासक्रम तयार करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यानुसार संजीवनीच्या व्यवस्थापनाने उद्योग जगताला अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश  अभ्यासक्रमात केलेला आहे, त्याचे परीणाम विध्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळण्यात होत आहे.
संजीवनीचे बहुतांशी  विध्यार्थी ग्रामिण भागातील आहे. त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळत आहेत. त्यांच्या पगाराचा काही भाग हा घरच्यांसाठी येणार आहे. यामुळे संजीवनी शैक्षणिक  संकुलाच्या माध्यमातुन ग्रामिण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळत आहे. याचा परीणाम सर्व सामान्य कुटूंबे समृध्द होताना दिसत आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते व त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. व्ही. एम. तिडके व त्यांची सर्व टीम आणि संबंधित विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here