सोनेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने बापूराव जावळे यांचा सत्कार

0

कोपरगाव ( वार्ताहर) गौतम बँकेच्या संचालक पदी कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील बापूराव दगुराव जावळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सोनेवाडी ग्रामपंचायतचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे,शिवाजी जावळे, निरंजन जावळे, आबासाहेब जावळे,चिलू जावळे, हेमराज जावळे ,के के जावळे, आबासाहेब दहे, नाना माळी, प्रभाकर जावळे, परसराम जावळे, विनायक चव्हाण, श्री गव्हाणे, भाऊसाहेब खरे ,सिताराम गांगुर्डे,संतु दहे अदी उपस्थित होते.

निरंजन गुडघे यांच्या हस्ते बापूराव जावळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी जावळे यांनी सांगितले की आ. अशोक काळे व स्वर्गीय दगूराव जावळे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.काळे परिवाराने त्यांनाही गौतम बँकेत काम करण्यासाठी जवळपास पंचवीस वर्षे संधी दिली होती. त्यांच्या अकाली निधनाने सोनेवाडी परिसरातील त्यांना मानणारा वर्ग सुन्न झाला होता मात्र पुन्हा बापूराव जावळे यांच्या रूपाने सक्रिय राजकारणात काळे कुटुंबाने त्यांना गौतम बँकेच्या संचालक पदी बिनविरोध संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असे त्यांनी सांगितले तर सत्काराला उत्तर देताना बापूराव जावळे यांनी काळे कुटुंबाने आपल्याला दिलेल्या संधीचे आपण नक्की सोने करून व प्रामाणिकपणाने काम करू ग्रामपंचायतीने केलेला सन्मान सत्कार हा माझ्यासाठी ऊर्जा देणारा ठरेल असे त्यांनी सांगितले. शेवटी उपसरपंच संजय गुडघे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here