सोनेवाडी विद्यालयाचा निकाल 86 टक्के कु.जावळे प्रथम ,कु.गुडघे द्वितीय ,वायसे तृतीय

0

सोनेवाडी (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयाने आपली निकालाची परंपरा राखली असून काल विद्यालयाचा दहावीचा निकाल 86.88 टक्के इतका लागला आहे.

विद्यालयाची विद्यार्थिनी जावळे श्वेया हेमराज हिने 500 पैकी 431 मिळवत  86.20 टक्के मार्क मिळवले. विद्यालयात तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. गुडघे आरती संजय हिने 500 पैकी 426 गुण मिळवत 85.20 टक्के मार्क्स मिळवले तिचा विद्यालय द्वितीय क्रमांक आला आहे तर वायसे ऋतिका भास्कर हिने 500 पैकी 424 गुण मिळवत 84.48 टक्के मार्क मिळवले आहे. तिचा विद्यालयात तृतीय क्रमांक आला आहे. तर देवयानी लक्ष्मण जावळे, ऋतुजा योगेश जावळे , ज्ञानेश्वरी संदीप जावळे, ऋतुजा मनोज ढवळे, अनुष्का किशोर औटी, ज्ञानेश्वरी माणिक जावळे, मंगल शांतीलाल पोतखुले , सुबोध भीमराज गुडघे,या विद्यार्थ्यांनी देखील यश संपादन केले असून विद्यालयात 82 टक्के गुण त्यांनी मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी आमदार अशोक काळे, आमदार आशुतोष काळे, काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब जावळे, भारत सर्व सेवा संघाचे संचालक केशवराव जावळे , मुख्याध्यापक सी जी जगताप, सरपंच शकुंतला गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, शिवाजी जावळे, विश्वनाथ जावळे, गौतम बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे, श्री ढेरे, श्री पवार, भाऊसाहेब आभाळे ,रावसाहेब जावळे, श्रीमती शुभांगी जठार, चंद्रकांत जगताप अदीसह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here