पंत प्रधान पहिले
नेहरुजी जवाहर
अंतर्बाह्यसुस्वरुप
राजबिंडे मनोहर
चांदीचमचा मुखा
जन्मताना बरोबर
सद्गुणांचावारसा
विरासत खरोखर
उच्चभ्रु विभूषित
शिक्षण अलंकार
लाभे सत्ता स्थान
तरी नसे अहंकार
क्रीडा संगीत कला
साहित्य जाणकार
जिव्हेवर सरस्वती
वक्तृत्वा अधिकार
सिध्दांतिक प्रतिमा
ते आदर्श चित्रकार
सर्वं धर्मियात प्रिय
धर्मनिरपेक्ष आकार
बालकात मिसळता
मनी विणा झंकार
परिस्थितीशी लढता
प्रज्वलित तो अंगार
प्रतिकूल परिस्थिती
दिले स्थीर सरकार
समर्थ सांभाळे भार
युगे मानती आभार
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
2
कॅमेरा ग्रस्त ..
कॅमेरा करे रखवाली
घालत राहतो गस्त
जागृत हा दिवसरात्र
माणसे बसली सुस्त
सीसी टिव्ही कॅमे-या
असते सर्वांची भिस्त
रेकाॅर्ड होते सर्वकाही
समाजा आली शिस्त
दचकून राहती सारे
कॅमेरा जणूं अण्वस्त्र
गुप्तहेर हा बिनधास्त
करतो रहस्य विवस्त्र
शोधू काढी लाचखोर
भ्रष्टाचारी रे मदमस्त
बंदुकीच्याशूटींगपेक्षा
व्हिडिओ शूटिंग मस्त
रे सत्य अचूक चित्रीत
भिती भयावह जास्त
पुरावे रे समक्ष समक्ष
कॅमे-या होई बंदिस्त
माणसांनी शोधलेला
तंत्रज्ञानाचा वरदहस्त
तिजोरीतून येई बाहेर
लपवून ठेवलेले दस्त
ब्लॅकमेल करी कुणा
खंडणीला करी त्रस्त
दुरूपयोग होतो कधी
बुमरॅंग बनते ते अस्त्र
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996