अतर्क्य असती कसे
हे विचीत्र नातेवाईक
सर्व डिफेक्टिव्ह पीस
बिघाड होई तांत्रिक
नको तेंव्हा गर्दी करी
भलते रे त-हेवाईक..
गरजेच्या वेळी गायब
वागे संदिग्ध सांशईक
समज गैरसमज पसरे
छळ करती मानसिक
उखांळ्यापाखाळ्यात
घालवी सारा लौकिक
सल्ले देतात अनाहूत
वाचाळविचारमौक्तिक
लक्ष खाजगीजीवनात
स्वातंत्र्य घेई वैयक्तिक
सांगावे वाटतेआवरावे
नको बुवा तुमची भीक
ज्यातत्यात लुडबुड ती
पुरे करा हो झिकझीक
ओव्हरडोस असह्य हो
पाजत राहता बौद्धिक
निंदानालस्ती भरलेली
डागण्या देती शाब्दिक
सर्वच जागी भेटतात
मनोऋग्ण अनुवंशिक
नाते गोते गोत्या आणे
प्रथा व्यथा पारंपरिक
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
2
मैत्री पहा ..
एकदा तरी निखळ
बा मैत्री करुन पहा
घेण्या पेक्षा देण्यात
आनंद केवढा महा
दुःखासोबत नक्की
पीडीता जवळ रहा
वेदना वरती फुंकर
जरा काळजी वहा
यश मिळता मित्रा
उत्सवी गुलाले नहा
विजयाचा जयघोष
दुम दुमो दिशा दहा
कठीण येता प्रसंग
आपणचं उभे तहा
भलेआपले समर्पण
हीत दोस्तांचे पहा
कठोर अडवा मित्रा
बळी पडताना मोहा
हृदय त्याचे वाचावे
अतर्क्य मानसडोहा
मैत्री कर्तव्य निभावे
जाणा कबीर दोहा
देहांतशासनहीअपुरे
माफी ना मित्र दोहा
संकटा सोबत दुःखे
घेई विदार्ण जिलोहा
छातीचा कोट करून
वेळी अडवा संमोहा
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.