अहवाल ../आरक्षण ..

0

अहवाल ..

भारत चतुर्थ स्थानी

सिप्रीचा रे अहवाल

संरक्षण सु व्यवस्था

झाली आता कमाल

अनाठायी वाटे खर्च

उठती लाख  सवाल

जाणावा रेअन्वयार्थ

नको फुकाचा बवाल

तलवारीइतकी भली

महत्वाची आहे ढाल

सैन्या  देई  खंबीरता

शस्त्रसज्ज उलाढाल

भक्कम दिसे किल्ला

शत्रुची  बदलते चाल

पैलवान  तो  बलदंड

थंडबंडाची हालचाल 

नको  वागणे  मवाळ

कधीतरी बना जहाल

जवान मनोबल वृध्दी

रयते बनवे  खुशहाल

सत्ता लालसा शेजारी

कुचाळ्या आज काल

आत्मनिर्भर बलशाली

करे  दुश्मनी अंतकाल

आरक्षण ..

आरक्षण देतो आम्ही

घोषणा गोड  थाटात

मनामध्ये असते एक

दुसरे तिसरे  ओठांत

तहान  भागेलं  कशी

पाणीचं नाही माठात

कुणाला नाही लंगोट

मात्र इतर सुटाबुटात

कोण टाकतोयं काटे

भल्या चांगले वाटात

शोधून  हवे  काढाया

कोण सामील कटात

आंदोलन सगळे थिटे

खारटपणा न मिठात

अदृश्य काही नाठाळ

पाणी कालवी पिठात

प्रत्येकाला हवा  हिरा

रे आपल्याचं मुकूटात

अलगद यावे रे सुयश

मिळाया हवे फुकटात

टोलवत ठेवायचा चेंडू 

रे वेग वेगळ्या कोर्टात

संपल्यावर सहनशक्ती

गाठतील तुम्हां घाटात

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306096.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here