अहिल्याई  होळकर…/माता अहिल्या…

0

समतोल राणी

(अहिल्याई) ..

मध्ययुगातलेआश्चर्य

सार्थ समतोल राणी

अहिल्याई  होळकर…..

स्नेहाळ नर्मदा पाणी

शोभे शुभ्रवस्त्रांकीत

साधीविशुद्ध रहाणी

माहेश्वरची समृध्दता

गा विरांगना कहाणी

एका हाता शिवलिंग

आशिष दे शिरोमणी

दुजा हातात तलवार 

गाजवे रणा  रागिणी

कला साहित्य शिल्प

सदैव दरबारात वर्णी

साम्राज्ञी सेवेत रमली

रोज सोडवे गा-हाणी

बळीराजा हो समृद्ध

न सांगता दर्द जाणी

सबळ बनवी महिला 

रूढीवर प्रहार हाणी

चोर  दरोडेखोर साव

उन्मतआणले वठणी

न्याय निवाडा अचूक

कार्य  पध्दती धाटणी

कर्तुत्वाच्या ठाई ठाई

रे भारतभर आठवणी

ऐकता तुमची कहाणी 

डोळ्यांत नर्मदा पाणी

2)

माता अहिल्या.

वसवलेशहर माहेश्वर 

पवित्र नर्मदा तीरावर

चप्पाचप्पा सांगेकथा

भासेअहिल्याई वावर

कवि गायक कलाकार 

कास्तकार  मूर्तीकार

माहेश्वरा  सांस्कृतिक

दिला सुबक  आकार 

रयतेच्या  कल्याणार्थ 

योजना समृद्ध अपार

पर्यावरणा  जपे राणी

निसर्ग स्नेह अपरंपार 

एका हाती शांत शंभो

दुस-या  हाती तलवार 

शोभते सरस्वतीलक्ष्मी

रे कधी दुर्गेचा अवतार

भुमिका न्याय  कठोर

निष्कलंक रे कारभार 

शरणा चोर दरोडेखोर 

सुखीजन माने आभार

राजकर्ती   माहिश्मती

पुण्य श्लोक   अवतार

मध्ययुगातले चमत्कार 

सहज घडतो नमस्कार 

माहेश्वरी भेटीस जाता

खुले इतिहासमहाद्वार 

चार विचार आचारता

होईल  जीवन  उध्दार

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here