कुटूंब ../सेन्साॅरशीप …

0

हस-या कुटूंबावरती

स्वताचं  उगारी गदा

टायगर बोले ज्यांना 

तोच  बनलायं  गधा

मिठाईचे लागले वेड

सोडून भाकरी कांदा

हे घर फोडण्यासाठी

कुठून आणतो  चंदा

नव सोयरीकीचे वेड

काय म्हणायचे छंदा

दोरखंड वळून  उगा

बनवतो फाशी फंदा

जमवता  समीकरणे 

झाली तिरफट  त्रेधा

आपले  येईना  परत

मनस्थिती का  द्विधा

इमले उभारू नवीन 

अरे पाया नीट बांधा

नंतर खुशाल  म्हणां 

टायगर अभी  जिंदा

मोडतआलेली नाती

जरा  हळूवार सांधा

अजून  होता  तुकडे

उलटा होणारं  वांदा

नेत्यांच्या वकृत्वाला

सेन्साॅरशीप ती हवी

ताल तंत्र फाट्यावर

स्त्रवू लागतात कवी….

खुर्ची  मध्ये बसलेले

रूप रेखाटता भावी

पेटून उठले मनातून

कसे बोले मानभावी….

खोला एखाद शाळा

शिकवा  मधूर ओवी

टोल नाका  तोंडाला

आवरा त्यांची  शिवी….

सांसदीयशब्दभांडार

शोधावी  भाषा  नवी

घुसळून  काढा तोंडा

रे आणावा भला रवी…

तोंडाला कुलुप लावा

फेका समुद्रात  चावी

दंड करा हरेक शब्दा

कधी करे  चावाचावी

आधीआवरा मिडीया

तिथे  चालते अरेरावी..

ब्रेकिंग न्यूज  नावानी

किती  पातके भरावी

टीआरपी वाढवायला

किती  करी  उठाठेवी

चौथा स्तंभ महत्वाचा

अरे  जरासे भान ठेवी….

— हेमंत मुसरीफ पुणे. 

   9730306996.

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here