रिफायनरी ../बहिरी गर्दी ..

0

रस्त्यावर सामसूम

असे सगळे  सतर्क

अधून मधून  कुणा

करत राहतो संपर्क…..

घेतो  पूर्ण काळजी

आधीचं  जाणे तर्क

सावध होतो  लगेचं

दिसता  काही फर्क…

भीतीचं करी  रक्षण

स्व  संरक्षणात गर्क

शहाणपणा जागृती

बनवू नये बुवा मुर्ख…

समस्त इंद्रिये सजग

बरोबर  करती  वर्क

काय होऊ शके बुवा

आधीचं लाखवितर्क….

गर्दी मध्ये लोक सारे

स्वतातचं  राही  गर्क

तिथे असे भय जादा

हाचं मोठाला  फरक

   

 

२)

रिफायनरी ..

रिफायनरी येणेआधी

लावली आग  धडाडा

जळाली  विचारशक्ती

राहिला  मागे  धुराडा…..

लग्नात कायम  विघ्न

परत  पाठवा व-हाडा

सोयरीक जमलीकशी

कुठे धाडले  बि-हाडा….

जंगल  तोडण्यासाठी

दांडा दिलात कु-हाडा

शिव्या शाप देत बसा

रे भावनाशून्य पहाडा….

राजमार्ग भलाचर्चेचा 

कोसभर नेऊन सोडा

पोटदुखी अति झाली

रे किती पिणार सोडा…

विचार जन भावनेचा

अभ्यास पुनश्च  थोडा

आगपाखड  सारा दूर

बा मने  मनाशी जोडा

प्रकल्प सोडून चालले

आपणचं करी ओरडा

दुटप्पीपणा अडकला

घसा  खरवडे  कोरडा

– हेमंत मुसरीफ पुणे

  9730306996.

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here