परिपाठ /दिनविशेष /पंचांग

0
सौ .सविता शांताराम देशमुख -   9511769689* 

🎤परीपाठ 📜
📱 सौ . सविता देशमुख . उपशिक्षिका – पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी ता – सिन्नर – नाशिक , मो . 9511769689

_*❂ 📆दिनांक :~ 20 जुलै 2023 ❂*_

    ❂🎴 वार ~ गुरूवार 🎴❂

      _*🏮 आजचे पंचाग 🏮*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ. २० जुलै
तिथी : शु. तृतीया (गुरू)
नक्षत्र : आश्लेषा,
योग :- सिद्धी
करण : तैतिल
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 07:02,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💡’कौतुक’ नावाची एक अशी ‘संजीवनी’ आहे, जी ‘आत्मविश्वास’ गमावलेल्याना पुन्हा जगण्याचं बळ देते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜

📌गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य.

🔍अर्थ:-
निरोपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆

♟️आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन.

*🫂स्वातंत्र्य दिन : कोलंबिया.*

*🏳️शांती व स्वतंत्रता दिन : उत्तर सायप्रस.*

*🤝मैत्री दिन : आर्जेन्टिना, ब्राझिल.*

🌞या वर्षातील🌞 201 वा दिवस आहे.

_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_

👉१८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
👉१८२८ : ’मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
👉१९०३ : फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.
👉१९०८ : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.
👉१९२६ : मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
👉१९४४ : दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.
👉१९४९ : इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
👉१९५२ : फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.
👉१९६० : सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.
👉१९६९ : अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.
👉१९७३ : केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
👉१९७६ : मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग -१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.
👉२००० : अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर
👉२०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.

_*💐जन्मदिवस / जयंती💐*_

👉१८२२ : ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)
👉१८३६ : सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)
👉१८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७१)
👉१९१९ : सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)
👉१९२१ : पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला – डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. (मृत्यू: ३१ मे १९९४)
👉१९५० : नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक

  _*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_

👉१९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.
👉१९३७ : गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (जन्म: २५ एप्रिल १८७४)
👉१९४३ : वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी १८८२)
👉१९६५ : बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)
👉१९७२ : गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)
👉१९७३ : ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)
👉१९९५ : शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५)
👉२०२०: भारतीय राजकारणी व सुप्रसिद्ध सामाजिक न्याय नेते राम अवधेशसिंग यादव यांचे निधन. (जन्म: १ जून १९३७)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉आकाशात उडणाऱ्या पक्षाना काय म्हणतात?
🥇नभचर

👉पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?
🥇H2O

👉अलका कुबल ही महिला कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
🥇मराठी सिने अभिनेत्री

👉जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशातील आहे?
🥇भारत

👉महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे?
🥇मध्य प्रदेश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻

🙏स्वामी अखिलानंद👣

स्‍वामी अखिलानंद हरिद्वारमध्‍ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत. एकेदिवशी ते शिष्‍यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्‍हा त्‍यांना आश्रमाच्‍या शेजारी असलेल्‍या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्‍यांना विचारल्‍यावर शिष्‍य म्‍हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्‍याचे सांगितले. त्‍यांचे फाटलेले कपडे पाहून स्‍वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्‍या आशेने येत असतील दोघे दुसरे काय? त्‍यांनी त्‍या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्‍व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्‍याने भांबावले, त्‍यामुळे ते दोघेही एक शब्‍द स्‍वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्‍वामीजी रागवत म्‍हणाले, तुम्‍हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्‍यावर या तुम्‍हाला प्रसाद द्यायची व्‍यवस्‍था मी करतो.” दोघेही बिचारे मान-अपमानाची पर्वा न करता स्‍वामीजींना नमस्‍कार करून निघून गेले. दुसरे दिवशी मात्र स्‍वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्‍वामींच्‍या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले. रामायण कथन करण्‍यासाठी स्‍वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्‍यात स्‍वामीजींचे लक्ष समोरच्‍या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्‍यांच्‍या रोजच्‍या जागेवर झाडावर भिजलेल्‍या अवस्‍थेत रामायण ऐकण्‍यासाठी येऊन बसलेले दिसले. स्‍वामीजींना राहवले नाही व त्‍यांनी त्‍या दोघांच्‍या समोर लोटांगण घातले व त्‍यांच्‍या रामभक्तीला नमस्‍कार केला.

🧠तात्पर्य – कोणालाही कोणी कमी समजु नयू. कोण कुठल्या अधिकाराचा असेल सांगता येत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी, ता. सिन्नर. जि . नाशिक
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा शिक्षण संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here