सिन्नर ; पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरेचे डॉ. सतीश केदार यांनी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. या शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्रात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे प्राथमिक स्वरूपातील आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना या वयात उदभवणाऱ्या विविध आजारांविषयी माहिती सांगून आपण या ऋतूत दूषित पाण्यापासून, वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जाण्यासाठी आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी म्हणून काळजी घ्यावी. मुलींच्या भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना याविषयी मार्गदर्शन केले व आपण आरोग्याची काळजी घेऊन बदलांना सामोरे जावे असे सांगितले.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी डॉ. केदार यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीतून शालेय विद्यार्थ्यांनी वेळोवेळी होणाऱ्या प्राथमिक रोगांविषयी माहिती घेऊन आपले आरोग्य स्वच्छ व नीटनेटके ठेवावे जेणेकरून आपले मन शाळेत प्रसन्न राहील. आपण जाणीव करून घेऊन वेळीच त्यावर प्रतिबंध करावा व उपाय योजना करून आपले आरोग्य नेहमी सुदृढ ठेवा. आहार, योग्य व्यायाम या गोष्टी शालेय जीवनात अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपले आरोग्य सुदृढ असेल तर अभ्यासात मन रमते असे सांगितले. यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी. के. रेवगडे, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम,एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, सविता देशमुख,सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.