शेती,घरकाम करत सावरगाव विद्यालयात मुलीनी मारली बाजी!

0

निकाल १०० टक्के; सोनाली गुंजाळ प्रथम तर श्रद्धा घोडेराव द्वितीय

येवला, प्रतिनिधी :

अंतरवेली येथून  सायकलवर तीन किलोमीटरवर  सावरगाव विद्यालयात रोज यायचे आणि जायचे…घरी गेले की आईला घर कामाला मदत करायची आणि पुन्हा शेतात जाऊन शेती काम करायचे अन उरलेल्या वेळात अभ्यास करायचा…अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आवड जोपासत सोनाली गुंजाळ या विद्यार्थिनीने सावरगाव विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे.वर्षभर शेती कामात अन घरकामात मदत करून अभ्यास करत तीने ९४ टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे.

सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा सेमी माध्यमाचा निकाल १०० टक्के तर एकत्रित निकाल ९४.६४ टक्के लागला.अतिशय प्रतिकूलतेवर मात करत कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे पेलवत शेतीसाठी मदतीचा हात देतानाच घरची जवाबदारीही निभावत मुलींनी बाजी मारली असून प्रथम पाचही क्रमांक मुलींनीच मिळवले आहेत.

वि.का. सोसायटीत काम करतांना आपल्या मुलीने चांगले शिकावे हि अपेक्षा भीमराव घोडेराव बाळगून होते,वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करत जीद्दिच्या जोरावर ८९.८० गुण मिळवत श्रद्धा घोडेराव हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. 

महत्वकांक्षी व शाळेला महत्व देणारी दिपाली तळेकर व निशा गायकवाड या शेतकरी कुटुंबातील मुली अनकुटे येथून सायकलवर पाच किलोमीटरचा प्रवास करून रोज शाळेत यायच्या.शाळेतून घरी गेली की पुन्हा आई-वडिलांना शेतीकामात मदतीचा हात देऊन अभ्यास करत दोघींना ८८.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला असून या मुलींनी संघर्ष करत मिळवलेल्या यशाचे कौतुक होत  आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी असूनही विद्यालयाचे ४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा पाटील,सहसचिव प्रविणदादा पाटील,युवा नेते संभाजीराजे पवार,माजी सरपंच प्रसाद पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना प्राचार्य शरद ढोमसे,नवनियुक्त प्राचार्य मारूती अलगट,पर्यवेक्षक आर.जी.पैठणकर,गजानन नागरे,योगेश भालेराव,उमाकांत आहेर,वसंत विंचू,पोपट भाटे,कैलाश मोरे,उज्वला तळेकर,ऋषिकेश काटे तसेच यशवंत दराडे,नामदेव पवार,लक्ष्मण माळी,संतोष विंचू,योगेश पवार,रविंद्र दाभाडे,संजय बहीरम,भाग्यश्री सोनवणे,सगुना काळे,सविता पवार,अर्चना भुजबळ,रोहिणी भोरकडे, प्रमोद दाणे,विकास व्यापारे,मयुरेश पैठणकर,रोहित गरुड,निलेश व्हनमाने, सागर मुंढे,मच्छिंद्र बोडके,लक्ष्मण सांगळे आदी मार्गदर्शक शिक्षकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here