उरण तालुक्यातील विविध समस्यांबाबत शिवसेनेने तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा.

0

८ ऑगस्ट रोजी धडक मोर्चाचे आयोजन.

उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे लेखी पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे आदेशाने शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी तहसीलदार उरण यांना दिले. यावेळी त्यांच्यासमवेत उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, तालुका उपसंघटक रूपेश पाटील, के एम घरत, विभागप्रमुख एस के पूरो, युवासेनेचे उरण शहर अधिकारी आशिष गोवारी, पूर्व विभाग अधिकारी अमित म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

शिवसेनेच्या मागणीने २४ जुलै रोजी सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तहसीलदारांनी बोलवलेली बैठक रद्द करण्याचे नेमके कारण काय ?  कुणाच्या दबावाने ही बैठक रद्द झाली ?  जनता विविध समस्यांनी त्रस्त असताना त्या सोडवण्याच्या बाबतीत प्रशासनाची असंवेदनशीलता नेमकी कशासाठी ? प्रशासनाविरोधात जनतेचा आक्रोश आहे, नागरिकांच्या समस्याबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याची भावना जनतेत आहे, त्याचा उद्रेक होण्याची वाट बघता का ? अशा प्रश्नाची सरबत्ती नरेश रहाळकर, संतोष ठाकूर , रुपेश पाटील, जयवंत पाटील यांनी केली. शिवाय तहसीलदारांची भूमिका निपक्ष नाही त्यामुळेच तहसील कार्यालयावर  ८ ऑगस्टला २०२४ शिवसेनेचा धडक मोर्चा येणारच असल्याचे निक्षून सांगितले. जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांची उदासीनता दूर झाली नाही तर अशा अधिकाऱ्यांना यापुढे शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला. 

      ८ ऑगस्टच्या मोर्चाच्या पत्राची प्रत माननीय जिल्हाधिकारी रायगड, सहायक पोलीस आयुक्त न्हावाशेवा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here