उरण नगर परिषदेत महात्मा गांधी जयंती लालबहाद्दुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.

0

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )

महात्मा गांधी जयंती निमित्त नगर परिषद क्षेत्रात २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. उरण नगर परिषदेच्या सानेगुरुजी बलोद्यान येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले सदर अभियानात उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव तसेच लेखापाल सुरेश पोसतांडेल, बांधकाम अभियंता निखिल ढोरे, नगर रचना अधिकारी निकम सर , स्वच्छता निरीक्षक हरेश तेंजी, तसेच उरण नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी श्रमदान केले.

उरण नगर परिषद हद्दीतील शाळामधील विद्यार्थी यांनी देखील श्रमदान केले. त्यानंतर स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत दिनांक १७ /९/२०२४ ते २ /१०/२०२४ दरम्यान नगर परिषदे मार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले होते(सायकल स्पर्धा, हेल्थ कँप, एक पेड माँ के नाम वृक्षारोपण) यांचे  बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सायकल रॅली मध्ये लकी ड्रॉ सायकल विजेत्या विद्यार्थ्यास सायकल देण्यात आली. 

उरण नगर परिषदेचे कर्मचारी व नागरिक यांच्या सहभागातून नगर परिषद कार्यालय ते महात्मा गांधी पुतळा पर्यंत स्वच्छता परेड काडण्यात आली. मुख्याधिकारी समीर जाधव यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले . तसेच कलाकारा मार्फत जनजागृतीपर  पथनाट्य सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here