उरण विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादिकडून (श प गट) लढविण्यास संतोष घरत इच्छुक.

0

रण दि. ११ (विठ्ठल ममताबादे ) उरण विधान सभा मतदार संघातील स्वच्छ चारित्र्य संपन्न नेतृत्व म्हणून जनता कामगार नेते संतोष घरत यांच्याकडे पाहते. शिवाय उरण तालुक्यातील जासई गावचे सुपुत्र असल्याने स्थानिक नागरिक म्हणून उरण तालुक्यातील  व उरण विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी संतोष घरत यांच्या नावाला पसंती दिली आहे.संतोष रोहिदास घरत यांनी उरण विधानसभा मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवावी अशी जनतेची इच्छा आहे.

जनतेचे हित लक्षात घेऊन व समाजसेवा देशसेवा करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच राजकारणाच्या माध्यमातून विविध समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने येणारी उरण विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय कामगार नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस संतोष रोहिदास घरत यांनी घेतला आहे.त्या दृष्टीने त्यांनी राष्ट्र‌वादी काँग्रेस पार्टी तर्फे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इच्छुक उमेदवारांची यादी प्रदेश कार्यालयात द्यावी असे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करत जनतेच्या कल्याणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आपला अर्ज सुपूर्द केला.

प्रदेश सचिव रविंद्र पवार यांनी संतोष घरत यांचा अर्ज स्विकारला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष रोहिदास घरत, उरण तालुका अध्यक्ष मनोज भगत,रायगड जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ पाटील,जिल्हा चिटणीस चेतन म्हात्रे,जिल्हा सरचिटणीस करण भोईर,तालुका चिटणीस भूषण ठाकूर,तालुका उपाध्यक्ष विनोद ठाकूर,उरण शहर अध्यक्ष मंगेश कांबळे,चिरनेर विभाग उपाध्यक्ष मनोज गोंधळी,उलवे शहर अध्यक्ष सुनीता हाडाले, उलवे शहर अध्यक्ष बाबासाहेब पाखरे,डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष डॉ शालिनी वरद,कार्यकर्ते नामदेव मढवी, दिपक पाटील,युवा कार्यकर्ते आदित्य घरत आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here