पोहेगांव (प्रतिनिधी)
आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांच्या नेतृत्वाखालीकोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत काळे गटाच्या सौ कविता ललित निळकंठ यांची बिनविरोध निवड झाली आहे .निवड प्रक्रियेचे कामकाज कुंभारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक रतन कहार यांनी दिली.
माजी उपसरपंच दिलीप ठाणगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. गावचा लोकनियुक्त सरपंच सौ देवयानी प्रशांत घुले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सौ कविता ललित निळकंठ त्यांच्या नावाची सूचना सौ. वैशाली सुभाष बढे यांनी मांडली एकच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे कहार यांनी जाहीर केले. यावेळी कुंभारी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री प्रशांत घुले म्हणाले की कुंभारी ग्रामपंचायतचा कारभार अत्यंत पारदर्शक सुरू असून विकासाकडे वाटचाल करणार आहे. ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ कविता ललित निळकंठ यांची बिनविरोध निवड झाली व सत्कार केला.
सत्कार स्वीकारताना ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित उपसरपंच सौ कविता ललित निळकंठ म्हणाल्या की, मला जनसेवेची मोठी संधी मिळत आहे सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास साठी तसेच गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी सतत प्रयत्नशील राहील.
यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य वैशाली सुभाष बढे , सौ रंजना संजय वारुळे , सौ मनीषा सागर घुले, राहुल विश्वनाथ पवार, रामराव दगू चंदनशिव, रंजनाबाई सिताराम गायकवाड, ज्योती सचिन अहिरे, अनिकेत हिरामण कदम, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष श्री शंकर साहदू शेळके, माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण पैठणे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते, त्र्यंबक वाघ, अर्जुन घुले, पोपटराव निळकंठ, रामदास पवार, भानुदास घुले, राजेंद्र निळकंठ, अशोक निळकंठ, गोपीनाथ निळकंठ, वाल्मीक कदम, वाल्मिक कदम, बापु वारूळे, पुरुषोत्तम महाजन, सोमनाथ निळकंठ, अशोक वाघ,तसेच युवा कार्यकर्ते सिध्दांत शिवाजी घुले,अभिजीत चकोर, संदीप निळकंठ, आदित्य महाजन, वसंतराव घुले, अमोल ठाणगे, रमण घुले, अनिल घुले,विकास वाघ, नयन निळकंठ, राहुल निळकंठ, सोमनाथ चंदनशिव, अतुल निळकंठ, अनिल मोहरे, एकनाथ पवार, नानासाहेब काशीद, नाना पवार, नितीन चीने, जितेंद्र महाजन, सुभाष बढे, अरुण निळकंठ, श्रीकांत पैठणे, तलाठी अप्पा नितीन सांगळे, पत्रकार गहिनीनाथ घुले, सागर घुले,आदी उपस्थित होते.