पुणे : राज्यात विविध ठिकाणी पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 4ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर आज आपण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांमध्ये कशाप्रकारे पाऊस असणार आहे.
हे जाणून घेऊया. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अनेक ठिकाणांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच आज रविवार आहे, त्यामुळे जर काही काम नसेल तर घराबाहेर पडणे टाळा.
त्याचप्रमाणे आज पुण्यातील घाट माथ्यावर अतिशय मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी केलेला आहे. पालघरमध्ये देखील आज अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील रेड अलर्ट जारी केलेला आहे. यासोबतच सातारा घाटपाथ्यावर देखील अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याला देखील आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
मुंबईमध्ये देखील आज पाऊस मुसळधार स्वरूपात हजेरी लावणार आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
त्याचप्रमाणे अहमदनगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हे जिल्हे सोडून इतर संपूर्ण राज्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. विदर्भात आज वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.