जासई हायस्कूल तर्फे लोकनेते दि.बा. पाटील पुण्यतिथी निमित्त अभिवादन.

0

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्यूनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई ता.उरण जि.रायगड या विद्यालयामार्फत स्वर्गीय, लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांच्या २४ जून या पुण्यतिथी दिनी अभिवादन करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या प्रांगणात दि.बा. पाटील साहेबांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्याचबरोबर इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यास व हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून पूजन केले. रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर आणि विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग, विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे,व इतर मान्यवरांच्या हस्ते दि.बा. पाटील साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दी.बा. पाटील साहेबांच्या जीवनावर भाषणे केली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. अतुल पाटील यांनी दी.बा. पाटील साहेबांचा जीवनपट आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. या पुण्यतिथी कार्यक्रमास जासई गावचे सरपंच संतोष घरत, विद्यालयाचे व्हाईस चेअरमन डी. आर.ठाकूर,यशवंत घरत, रघुनाथ ठाकूर ,आदित्य घरत, बाबुराव मढवी,रमेश पाटील, सुभाष घरत,प्रकाश म्हात्रे, गिरीश म्हात्रे, माणिक म्हात्रे, अरुण म्हात्रे ,घरत टी. टी, वंदना म्हात्रे, पुष्पा म्हात्रे, तर आताच या विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले श्रेष्ठ शिक्षक नुरा शेख आणि शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here