जिल्हा कार्यालयासमोर आफ्रोहतर्फे आमरण उपोषण सुरूच….

0

सातारा : ऑर्गगाईझेंशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन (आफ्रोड), महाराष्ट्र यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

    सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२१ डिसेंबर २०२९च्या शासन निर्णयातील मु.क्र.४.२ नुसार औषध निर्माता मिश्रक सेवासमाप्त कर्मचारी यांना अधिसंख्य आदेश देणे.अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी यांना त्वरित पेन्शन लागू करून ग्रॅज्यूईटी व इतर लाभ देण्यात यावेत.मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना पेन्शन व इतर लाभ मिळावेत.कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वानुसार नोकरीत सामावून घ्यावे.अनुकंपा तत्वानुसार एका व्यक्तीस नोकरीत सामावून घ्यावे. सेवासातात्य देऊन वार्षिक वेतन, वेतनवाढ व इतर सेवाविषयक लाभ देण्यात यावा.तसेच शासनाने अधिसंख्य कर्मचारी विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सर्व याचिका परत घ्याव्यात.अशा मागण्यांसाठी उपोषण सुरू असून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत  आफ्रोहतर्फे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.निवेदन दिल्याप्रमाणे जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचे कार्यकर्त्यानी सांगीतले असून विविध संघटनांकडून जाहीर पाठींबा मिळत आहे.वंचित संघर्ष मोर्चातर्फे जिल्हा संयोजक चंद्रकांत खंडाईत,गणेश कारंडे, रिपब्लिकन सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले,वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई,धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे,राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे संस्थापक अनिल वीर,भरत मोरे,उत्तम दशरथ (कराड),किरण अडसूळ,मालन खोचे,हणमंत गडकरी,सुजाता गडकरी,टी. सुरेखा व श्रद्धा वनदेव आदीं शेकडो कार्यकर्त्यानी  दोन दिवसात भेट देऊन जाहीर पाठींबा दिला आहे.याकामी, आफ्रोहचे जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ,उपाध्यक्ष मच्छिन्द्रनाथ माने,सचिव वनदेव थीगळे, कार्याध्यक्ष केशव वानखेडे, कोषाध्यक्ष उमेश लोखंडे व कार्यकारी सदस्य यांनी अथक असे परिश्रम घेऊन नीटनेटके नियोजन केले आहे.

फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणणास बसलेले आफ्रोहचे पदाधिकारी,मान्यवर व कार्यकर्ते.( छाया-अनिल वीर)