नवघर गावात राहणा-या भाडेकरूचा हारवलेला मुलगा गावातच सापडला

0

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे ) : शनिवार दि.२२/१०/२०२२ रोजी उरण तालुक्यातील नवघर येथील भाड्याने राहणारे मनजय राजभर यांचा आठ वर्षाचा मुलगा नेहमी प्रमाणे ट्युशनला जातो असे सांगून सकाळी १० वाजता  घरातून गेला असता दोन/तीन तास उलटुन गेले तरी घरी आला नाही म्हणून त्याच्या आई-वडीलांनी ट्युशनमध्ये जाऊन चौकशी केली असता सदर मुलगा ट्युशनला आलाच नाही असे समजले.संपूर्ण नवघर गावात शोधाशोध केली तरीही मुलगा सापडत नाही हे पाहून नवघरचे माजी उपसरपंच विश्वास तांडेल हे त्याच्या वडीलांना घेऊन जाऊन उरण पोलिस स्टेशन येथे मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. उरण पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक रतन राठोर आणि संतोष जगदाळे तात्काळ घटनास्थळी येऊन आई-वडील तसेच आजूबाजूला राहणा-यांची चौकशी करून त्या रस्त्यावरील रायगड भुषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या घराजवळ असणारे सि.सि.टिव्ही फुटेज तपासले असता काहीही सुगावा लागत नाही हे पाहून ग्रामपंचायतीचे लावलेले सर्वच सी.सी.टिव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला.सदर पोलिस अधिका-यांनी ग्रामपंचायत कर्मचारी मनोहर पाटील व कैलास भोईर यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन ग्रामपंचायतीने लावलेले सी.सी.टिव्ही फुटेज तपासायचे असून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाकडे बोलावून घेतले असता ग्रामपंचायतीचे सी.सी.टिव्ही फुटेज पाहण्यास सदर पोलिस अधिकारी जात असताना सदर मुलगा वाटेतच सापडला.यावेळी उरण पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक रतन राठोर आणि संतोष जगदाळे यांनी त्या मुलाचे आई-वडील तसेच त्याच्या नातेवाईकांना दिलासा देऊन योग्य प्रकारे सहानुभूती पुर्वक या प्रकरणाची  तत्परतेने हाताळणी करून योग्य मार्गदर्शन करून मुलाच्या आई-वडीलांनाही योग्य मार्गदर्शन केले.यावेळी रायगड भुषण प्रा.एल.बी.पाटील,नवघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष समाधान तांडेल,माजी उपसरपंच विश्वास तांडेल,उपसरपंच परेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पानसरे यांच्यासह त्या मुलाचे भाडेकरू नातेवाईक,नवघर ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here