मयुरेश्वर इंग्लिश मीडियम  स्कुलचा दहावीचा १००% निकाल… रुचिता रोहमारे प्रथम

0

कोपरगाव (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ने आपल्या निकालाची शंभर टक्के असलेली परंपरा कायम राखली असून यावर्षीचा दहावीचा निकालही शंभर टक्के लागला आहे.विध्यार्थ्यांनीं भरघोष यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले आहे. कु. रोहमारे रुचिता नरेंद्र  हिने ८९.८० टक्के गुण मिळत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. कु. पोटे प्रणिता ज्ञानेश्वर हिने  ८६.८० टक्के गुण मिळत विद्यालयात दुसरा येण्याचा मान मिळवला.कु.औताडे उत्कर्षा संदीप हिने  ८५.८०  टक्के गुण मिळवत विद्यालयात तिसरा  येण्याचा मान मिळाला.श्रद्धा दशरथ होन हिने ८४.४०%* टक्के गुण मिळत चौथा क्रमांक पटकावला.तर अनुराग प्रमोद वाके हिने ८३.६० टक्के गुण मिळवत विद्यालयात पाचवा क्रमांक मिळविला. महाराष्ट्रातील इतर शाळेतील निकालाप्रमाणेच मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देखील मुलींनीच टॉपर मध्ये मुलीनीच बाजी मारली आहे.

विद्यालयातील दहावीच्या बोर्ड परीक्षेस ४१ विद्यार्थी बसलेले होते सर्वचे सर्व ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा व सायन्स शिक्षिका वैशाली साळुंके, विद्यालयाच्या प्राचार्या इतिहास शिक्षिका कविता वीसे, विलासराव साळुंके,माध्यमिकच्या पर्यवेक्षिका व मराठी व हिंदी विषय शिक्षिका तसेच वर्गशिक्षिका माधुरी प्रवीण होन, गणित व भूमितीच्या शिक्षिका जयपत्रे जया, इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करणाऱ्या शीतल औताडे, इंटरमिजिएट ची परीक्षा तयारी करून घेणाऱ्या सुरेखा लांडगे, तसेच प्राथमिक व पूर्व प्राथमिक च्या पर्यवेक्षिका सवैशाली वर्पे ,सौ रेणुका औताडे आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here