येवला प्रतिनिधी
अंदरसुल- संत नागेबाबा मल्टीस्टेट येवला शाखा व नागेबाबा परिवार अहमदनगर यांच्या मार्फत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालय व ज्यु कॉलेज अंदरसुल यांना दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी नागेबाबा वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित केले. सदर पुरस्काराचे वितरण येवला येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालय झाले. येवला सेवाकेंद्र,संचालिका नीता दीदी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण येवला येथील सेंटरला करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे आराध्य दैवत श्री संत नागेबाबांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात तसेच वृक्ष संवर्धनासाठी ज्या संस्था काम करतात अशा एकूण बारा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालय अंदरसुल, व मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्यू कॉलेज अंदरसुल या शैक्षणिक संस्थांचे वृक्षारोपण कार्यक्रमास विशेष योगदान लाभल्याने त्यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले वृक्षमित्र पुरस्कार अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे , संचालक राजेंद्र गायकवाड प्राचार्य सचिन सोनवणे , मुख्याध्यापिका जयश्री परदेशी ,सुषमा सोनवणे यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला .
सदर कार्यक्रमासाठी नागेबाबा संस्थेच्या शेअर्स डिपार्टमेंट हेड योगिता पठारे , शाखा समन्वयक स्वप्निल गाडेकर,शाखाधिकारी येवला ,राम नाईक हे उपस्थित होते.
संस्थेला पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे,उपाध्यक्ष सुदाम सोनवणे,खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक उज्वल जाधव ,बी के जाधव , जीवन गाडे,आकाश सोनवणे, जनार्धन जानराव, मयूर सोनवणे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.