अनिल वीर सातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या साहित्यसम्राट डॉ अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आर्टी) ची स्थापना तसेच मातंग समाजातील विध्यार्थी आणि कर्जदार यांना विविध धनादेशाचे वितरण असा संयुक्त समारंभ दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शिंदे यांच्याच प्रमुख उपस्थितीत झाले आहे.
आर्टी च्या निमित्ताने राज्यातील तमाम मातंग समाजाची गेल्या अनेक वर्षाची महत्व पूर्ण मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे केवळ हीच मागणी नाही तर या समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच खऱ्या अर्थाने राज्यातील सकल मातंग समाजाच्या पाठीशी असल्याचे सिद्ध झाले आहे.अशी प्रतिक्रिया सध्या राज्यातील तमाम मातंग समाजमधून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सकल मातंग समाजाला आजपर्यंत आपल्या विविध मागण्यांसाठी केवळ आश्वासने देण्यात आली त्यामुळे या समाजाच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या शासन पातळीवर प्रलंबीतच राहिल्याने हा समाज अनेक वेळा शासकीय पातळीवर उपेक्षित राहिल्याचे दिसून आले.
मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सकल मातंग समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिल्याचे दिसून येते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच प्रयत्नाने आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली नुकतीच सूचनेनुसार बैठक घेण्यात आली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातंग समाजाच्या मागण्याबाबत सकारात्मक आहेत मुंबईत आझाद मैदान येथे मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.