आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, कार्तिक शुक्ल त्रयोदशी, शनिवार , दि. २५ नोव्हेंबर २०२३, चंद्र – मेष राशीत, नक्षत्र -अश्विनी दुपारी २ वा. ५६ मि. पर्यंत नंतर भरणी, सुर्योदय- सकाळी ६ वा. ५३ मि. , सुर्यास्त- सायं. १७ वा. ५८ मि.
नमस्कार आज चंद्र मेष राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज चन्द्र – गुरु युतीयोग, शनि – मंगळ केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, तुला, धनु, मकर , कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर वृषभ, कन्या व वृश्चिक या राशींना प्रतिकूल जाणार आहे.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : तुमचा उत्साह व उमेद वाढेल. गेल्या दोन दिवसांपेक्षा आजचा दिवस अनुकूल असणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. आरोग्य सुधारेल.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. प्रवास टाळावेत. काहींना अनावश्यक खर्च संभवतात.
मिथुन : जुने मित्र मैत्रिणी भेटल्याने आनंदी व्हाल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी असणार आहे. आनंदी रहाल.
कर्क : मनोबल उत्तम राहील. आरोग्य सुधारेल. कामाचा ताण कमी होणार आहे. वरिष्ठांना खुश कराल. प्रतिष्ठा वाढेल.
सिंह : मानसिकता बदलणार आहे. नकारात्मकता जाईल. कामे मार्गी लागणार आहेत. आरोग्य सुधारेल.
कन्या : मनोबल कमी असणार आहे. आरोग्य जपावे. वाद विवादात अडकू नये. कायदेशीर बाबी जपाव्यात. कामाचा ताण राहील.
तुला : आरोग्य उत्तम राहील. अनेक बाबतीत सकारात्मक अनुभव येतील.उत्साही व आनंदी राहणार आहात. अनुकूलता लाभेल.
वृश्चिक : काहींना आरोग्याचा त्रास संभवतो. इस्पितळास भेट द्यावी लागेल. मनोबल कमी राहील. कामे रखडणार आहेत.
धनु : आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करणार आहात. मनोबल वाढेल. कामाचा ताण राहील.
मकर : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कामे पूर्ण होणार आहेत. दैनंदिन जीवनात काही सकारात्मक अनुभूव येतील
कुंभ : जिद्दीने कार्यरत रहावे. आपले काम चोखपणे पार पाडाल. आळस कमी होईल. हळूहळू मानसिकता बदलणार आहे.
मीन : आर्थिक लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.
आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४