आ. प्रशांत बंब यांनी क्षीरसागर कुटुंबियांचे तोंडभरून केले कौतुक…..
गंगापूर तालुका प्रतिनिधी,(गुलाब वाघ ) : तालुक्यातील लासूर स्टेशन येथील क्षीरसागर कुटुंबबिय दरवर्षी घरी महालक्ष्मीच्या देखाव्यातून वर्षभरातील घडलेल्या ज्वलंत घटना यांचे देखावे साकारत असतात यावर्षी महाराष्ट्र सरकारची महिला वर्गात सर्वाधिक लोकप्रिय असलेली “लाडकी बहीण योजना” साकारली असून लासूर स्टेशन शहरातील विविध समस्याही देख्याव्यातून साकारल्यानें आ.प्रशांत बंब यांनी लाडक्या बहिणीचा देखावा सादर केलेल्या क्षीरसागर कुटुंबियांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
दरवर्षी गणरायाची स्थापना झाल्यानंतर गौराईचे आगमन होते पहिल्या दिवशी आगमन दुसऱ्या दिवशी मीष्ठान्न भोजन तिसऱ्या दिवशी गौराईला निरोप दिला जातो लासुर स्टेशन येथील सौं.सायली योगेश क्षीरसागर वं कुटुंबियांच्यावतीने दरवर्षी महालक्ष्मी उत्सव गौराईपुढे आगळावेगळा पद्धतीने केला जातो मागील 12 वर्षापासून महालक्ष्मी उत्साहात विविध सामाजिक संदेश देण्याचे देखावे तयार करून एक वेगळा आदर्श क्षीरसागर कुटुंबाने समाजापुढे ठेवला आहे आत्तापर्यंत स्वच्छ गाव सुंदर गाव ,महाड सावित्री नदी दुर्घटना ,स्वच्छ भारत अभियान, साईबाबा समाधी सोहळा, कोल्हापूरची पूर परिस्थिती, हर घर तिरंगा, केंद्रशासित जलजीवन मिशन योजना, कोरोना महामारी यासारख्या अनेक योजना व संकटे यांचा हुबेहूब देखावे आतापर्यंत सादर करण्यात आले आहे.
तसेच यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध शासकीय योजनेचा देखावा तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, कामगार कल्याण योजना,जिल्हा परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, जल जीवन मिशन,प्रधानमंत्री आवास योजना,जलयुक्त शिवार, सिंचन विहीर, गाय गोठा, उज्वला गॅस योजना,प्रधानमंत्री सोलर योजना,महात्मा गांधी रोजगार हमी योजना तसेच गंगापूर तालुक्याचे आ. प्रशांत बंब यांच्या संकल्पनेने गीताबन यात्रा निमित्तचा अष्टविनायक यात्रा, पोहरादेवी यात्रा, बुद्धगया यात्रा,अजमेर शरीफ यात्रा, प्रत्येक गावातील भजनी मंडळ यांना भजनी वाद्य संच वाटप, महिला सक्षमीकरणाअंतर्गत मोफत वाहन प्रशिक्षण, तसेच लासुर स्टेशन येथील आराध्य दैवत श्री गणेश मंदिर संस्थान, लाडक्या बहीण योजना फॉर्म भरण्याकरता सेतू सुविधा केंद्र, बँक, एटीएम, बँकेत केवायसी करण्याकरता होणारी गर्दी लासुर स्टेशनचा अत्यंत ज्वलंत प्रश्न रेल्वे क्रॉसिंग वर होणारी गर्दी, वर्धमान जैन स्थानक संघ ,श्री स्वामी समर्थ केंद्र नुकताच झालेला घृष्णेश्वर शिवमहापुराण प्रसंगाचा वं लासुर स्टेशन शहराचा हुबेहूब देखावा तयार करण्यात आला आहे हा देखावा बघण्यासाठी अनेकांनी क्षीरसागर कुटुंबाच्या घरी भेट देऊन कौतुक केले जात आहे सौ सायली योगेश क्षीरसागर, सचिन क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबियांच्या या देखाव्याचे अनेक लोक पाहण्यासाठी गर्दी करत आहेवं क्षीरसागर कुटुंबियांचे अभिनंदन करून कौतुक करत आहे.