सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान उरण यांच्या वतीने पिरकोन येथे वृक्षारोपण

0

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान उरण आणि महाराष्ट्र गुन्हे तपास  साप्ताहिकचे पत्रकारांतर्फे उरण तालुक्यातील पिरकोन येथील काशी डोंगरावर वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गुन्हे तपास साप्ताहिकचे पत्रकार सदस्य आणि सदाबहार दोस्ती ग्रुपचे सर्व सदस्य तसेच सारडे विकास मंच आणि ऑक्सिजन पार्कचे निर्माते नागेंद्र म्हात्रे,पिरकोन गावचे निसर्गप्रेमी विनायक गावंड, नवघर गावचे गड प्रेमी गणेश भोईर, तसेच नंदाई प्रतिष्ठान वशेनीचे डॉक्टर हिराचंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उरण तालुका अध्यक्ष कैलास पाटील तसेच महाराष्ट्र गुन्हे तपास साप्ताहिकचे पत्रकार सदस्य  तुकाराम गावंड , कामेश्वर म्हात्रे, संतोष जोशी , हरीचंद्र म्हात्रे , जितेंद्र म्हात्रे, सचिन पाटील , अरुण म्हात्रे, विजय गावंड या सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here