समाजभूषणाने संतोष पारसे सन्मानित 

0

सातारा/अनिल वीर :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील होलार विद्यार्थी सहाय्यक फाउंडेशन उपक्रमांतर्गत, शिक्षण तुमचे सहकार्य आमचे….या न्यायाने समाज भुषण पुरस्कार राजस संस्कृतीभवन, पुणे येथे विविध मान्यवरांना वितरित करण्यात आले.  

 शैक्षणिक, सामाजिक, संस्कृतीक व संघटनात्मक योगदानाबद्दल दिला जाणारा सन २०२१ -२२ चा समाज भुषण पुरस्कार संतोष सोपान पारसे (दहिवडी) यांनाही  मिळाल्याबद्दल होलार विद्यार्थी सहाय्यक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भारत कडलासकर, सचिव, संचालक,सल्लागार आदींनी अभिनंदन केले आहे.यावेळी प्रमुख पाहुणे मा.आ.विक्रमसिह सावंत (जत विधानसभा), ऍड. किरण जावीर (राष्ट्रीय अध्यक्ष होलार समाज),श्रीकांत साबळे, आयवळे साहेब (अव्वर सचिव जलसंपदा मंत्रालय), डॉ. पारसे (सोलापूर),जावीरसाहेब (पुणे बोर्ड संचालक), प्रा पांडुरंग ऐवळे (पाटण),सोनवणे साहेब (पीएसआय क्राईम ब्रँच नाशिक),सौ. कडलासकर, सौ. सोनवणे  (उद्योजिका नाशिक ), प्रा.सुनील आयवळे(ठाणे). बाळासो पवार, अशोक पवार, प्रकाश पवार (उद्योजक पुणे ),सतीश गेजगे (उदयोजक पुणे ),नवनाथ हत्तीकर (MRI technical pune) आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

         यावेळी समाजातील गरीब, गरजू,पदवी ते पदव्यूत्तर शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यांना आर्थिक मदत वितरण करण्यात आले.एमपीएससी तयारी करणाऱ्या अध्ययनार्थीना पुस्तकं वाटपही करण्यात आले. 

फोटो : संतोष पारसे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.(छाया-अनिल वीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here