सोलापुरात सराफ दुकाणातून दोन किलो चांदी अन्‌ सोन्याचे दागिने पळवले

0

सोलापूर : शहरातील पूर्व भागातील बालाजी ज्वेलर्स हे सराफ दुकान फोडून चोरट्यानं दोन किलो चांदी आणि सोन्याचे दागिन्यांवर डल्ला मारुन पोबारा केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास नवीन विडी घरकूलकडे जाणाऱ्या मार्गावरील कर्णिच चौकात ही चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

निलमनगर नवीन विडी घरकूलकडे जाणाऱ्या मार्गावरील कर्णिक चौकात विनोद मुरलीधर सुंचू यांचे बालाजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. यातील दुकानाचे मालक मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन गेले होते. पहाटेच्या सुमारास नजर ठेऊन सराईत गुन्हेगारांनी हे काम केले असावे, असा संशय एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून आतील विक्रीसाठी ठेवलेली २ किलो चांदी, सोन्याचे दागिने असा ऐवज पळवून नेला. नेमका किती माल चोरीला गेला याबद्दल पोलीस शोध घेत आहेत. फिर्याद नोंदवण्याचे काम सुरु आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here