“३९ वर्षा नंतर मिळणार नवीन शेवा गावाला हक्काची जमीन”

0

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील न्हावा शेवा बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शेवा गावठाणाची जमीन सुधा लागेल असे बनावट कारण सांगून शासनाने शेवा गावातील ग्रामस्थांना विस्थापित करून मौजे बोकडवीरा येथील जमिनीवर गेली ३९ वर्ष तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्यास ठेवले होते. एमआरपीटीपी ॲक्ट १९७६ नुसार या विस्थापितांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. परंतु या विस्थापितांना शासनाने दुर्लक्षित करून ३३ हेक्टर ऐवजी फक्त १० हेक्टरवर तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्यास ठेवले होते.

गेली अनेक वर्षे गावकरी संघर्ष करून, आंदोलने करून आपला हक्क मांगत होते पण शासन व जेएनपीटी या कडे दुर्लक्ष करून खोटी नाटी कारण सांगून टाळाटाळ करीत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून गावातील ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून व सततचा पाठ पुरावा करून शेवटी यश पदरी पाडले. सोमवार दिनांक ०१/०७/२०२४ रोजी जेएनपीटी पुनर्वसित नवीन शेवा गावाची ३३.६४.०५ हेक्टर जमिनीची कायमहक्क मोजणी करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here