अनोळखी व्यक्तीला उपचारासाठी  मदत.

0

उरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) रविवार दि.16/10/2022 रोजी मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथील नवघरपाड्या मधील कानकेश्वरी मंदिराच्या सभामंडपात एक अनोळखी इसम चार/पाच दिवसा पासून तिथेच पडून होता. त्याच्या पायाला मोठ-मोठ्या जखमा झालेल्या असून मंदिर परिसरात खुप दुर्गंधी पसरली होती. त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव डावखर असे सांगितले. त्याच्या मागे कोणी जवळचे नातेवाईक नव्हते. सदर परिस्थिती लक्षात घेऊन नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते एम डी भोईर घटना स्थळी दाखल झाले त्यांनी हॉस्पिटल मध्ये सदर बाब कळविली असता उरण सरकारी दवाखान्याची रूग्णवाहीका घेऊन डा‌ॅ. तांबोळी आणि त्यांच्या सहका-यांनी तत्परता दाखवून सदर इसमास उरण येथील इंदिरा गांधी शासकीय दवाखान्यात घेऊन गेले असता  रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जे.जे.हाॅस्पिटल येथे नेण्यात आले. यावेळी नवघर गावचे सामाजिक कार्यकर्ते एम डी भोईर ,नवघरचे उपसरपंच परेश पाटील,चरण पाटील,प्रणय बंडा,संकेत बंडा या तरूणांनी सामाजिक बांधिलकीतून अनोळखी व्यक्तीस मोलाचे सहकार्य केले.या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here