आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिपलक्ष्मीमध्ये गाजलेल्या गीतांची मैफिल रंगणार !

0

सातारा : दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला, “दीपावली संध्या” या कार्यक्रमात हिंदी व मराठीत गाजलेल्या गीतांची मैफिल शुक्रवार दि.२१ रोजी सायंकाळी दिपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात रंगणार आहे. 

         यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र पाटील, अनिल वीर,सागर पावसे,सतीश नेवसे व विनायक भोसले आहेत.”नवी स्वप्ने नवी क्षितिजे,घेऊन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नाना, दिव्ययशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,ही दिवाळी …” या पद्धतीने सभासद,खातेदार व हितचिंतकाना पतसंस्थेचे शुभेच्छा दिलेल्या आहेत.सदरच्या कार्यक्रमात संकल्पना-दिग्दर्शक मुकुंद पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण कुलकर्णी, सौ.विजया चव्हाण, सौ.ज्योत्स्ना खुटाळे, ऍड. लक्ष्मीकांत अघोर,सौ.प्रिया अघोर,ऍड. आशुतोष वाळिंबे व सौ.रेश्मा वाळिंबे या कलाकारासह सुभाष कुंभार यांची ध्वनी व्यवस्था आहे. याकामी, पतसंस्थेचे संस्थापक – चेअरमन शिरीष चिटणीस,मुख्य शाखेचे अधिकारी  लक्ष्मण कदम, व्यवस्थापक विनायक भोसले, व्हाईस चेअरमन सौ.सुरेखा रानडे व कर्मचारीवृंद अथक असे परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here