उरणमध्ये सुसज्ज हॉस्पिटल व्हावे यासाठी उरण सामाजिक संस्थेचा पुढाकार.

0

उरण दि 1(विठ्ठल ममताबादे)

उरण तालुक्यासाठी सुसज्ज हॉस्पिटलच्या मागणीसाठी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यासाठी रविवार दि 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा. उरण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य तहसील कार्यालयात तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

उरण सामाजिक संस्था सन 2010 पासून तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल व्हावे या मागणीसाठी दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन , निदर्शने आदी मार्गांचा अवलंब करत आलेली आहे.2011च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन आमदार विवेकानंद पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे आणि माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उरण मध्ये 100 खाटांचे उपरूग्णालय उभारण्यासाठी सिडकोकडून भूखंड मंजून झाला असून त्याची किंमतही देण्यात आली आहे . या प्रत्येक बाबतीत उरण सामाजिक संस्थेचा सहभाग महत्वपूर्ण राहिला आहे .2017 साली संस्थेने मा. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र.137/2027 दाखल केलेली आहे . मा. न्यायालयाच्या आदेशानुसार जेएनपीटी हॉस्पिटलमधे ट्रॉमा केअर सेंटर उभारले गेले आहे.तसेच या जनहित याचिकेमुळे जेएनपीटी प्रभावीत क्षेत्रातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये आमुलाग्र सुधारणा झाल्या आहेत .उरण मध्ये हॉस्पिटलचे कामकाज सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन  तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यासाठी रविवार दि. 2 आक्टोंबर रोजी सकाळी 10.30 सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here