उरण मधील युवा समाज सेवक  विवेकभाई पाटील यांना पितृ शोक.

0

उरण दि 15(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील जाणता राजा प्रतिष्ठान पागोटेचे संस्थापक,अध्यक्ष विवेक भाई पाटील यांचे वडील  स्वर्गीय कै. चंद्रकांत जनार्दन पाटील रा.पागोटे, वय 65 वर्ष यांचे गुरुवार दि.13/10/2022 रोजी आकस्मित निधन झाले. त्या आकस्मित निधनाने संपूर्ण पाटील परिवारावर आणी पागोटे गावावर शोककळा पसरली आहे.स्व.चंद्रकांत जनार्दन पाटील हे  एक अष्टपैलू व्यक्तीमत्व होते.एक अशी व्यक्ती की गावात सर्वांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणारे सर्वांशी हसत खेळत मानस जोडणारी व्यक्तिमत्व होते.कबड्डी खेळाडू, नाट्य लेखक,कवी,सूत्रसंचालक, भजनी बुवा अशी त्यांची वयक्तिक ख्याती होती. ते धनांनी जरी श्रीमंत नाही झाले पण मनांनी खूप मोठे श्रीमंत होते. त्यांच्या अत्यंविधी साठी पागोटे स्मशान भूमी मध्ये मोठा  जनसमुदाय लोटला होता. ही खरी श्रीमंती त्यांनी कमावली. त्यांच्या  पश्चात त्यांची पत्नी देवयानी पाटील,  मुलगा  विवेक  पाटील, सून  प्रतीक्षा  पाटील, नातू आराध्य, मुलगी प्रगती गजानन तांडेल(सोनारी ), पुनम संतोष  दमडे(भागरपाडा ), संपदा महेंद्र नाईक(कोल्हीकोपर,पनवेल ) , ज्योती गणेश नागे (खोपोली )व 16 नातवंडे, 2 भाऊ  असा मोठा परिवार आहे . सर्व पाटील कुटुंब मध्ये ते सर्व कार्यक्रमामध्ये अग्रेसर असत. मात्र कै. चंद्रकांत पाटील यांचे आकस्मिक निधन झाल्याने पाटील कुटूंबीयावर मोठे दुःख कोसळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here