उलवे येथे दसरा सणांनिमित्त आपट्याच्या बीज वाटप व बीजारोपन संपन्न.

0

वटवृक्ष सामाजिक संस्थेचा उपक्रम.

उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )दसऱ्याला सोन्या सारखा मान असणारे लुटता येणारे सोनं म्हणजे आपट्याची पानं, विजयादशमीच्या दिवशी सोने म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. भारतीय सण व वृक्ष यांच अतुट नातं आहे. उलवे परिसरात आपटा वृक्षांची अधिक संख्येने वाढ होण्यासाठी वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसरा सणाचे औचित्य साधून आपट्याचे बीज रोवून शेकडो बीज वाटप करण्यात आले.

स्थानिक नाव आपटा तर वनस्पतीचे शास्त्रीय नाव बहूनिया रेसिमोसा आहे. मार्च ते एप्रिल महिन्या दरम्यान हा वृक्ष फळ धारण करतो. आपट्याची बी उगवण क्षमतेची कालमर्यादा १२ ते २४ महिन्यापर्यंत आहे. उगवण क्षमता ६० ते ९० टक्के इतकी असून उगवण होण्यासाठी साधारण २० ते २१ दिवस लागतात. संस्थेमार्फत ह्या नवरात्र उत्सव दरम्यान उलवे शहरातील दिशा कॉम्प्युटर इन्सिट्यूटच्या विद्यार्थ्यांना सुचिता कोळी यांच्या माध्यमातून तसेच कीर्ति कॉम्प्युटर इन्सिट्युट शाखा उलवे येथील विद्यार्थ्यांना भुषण पाटील आणि श्वेता धनावडे यांच्या वतीने आपट्याच्या शेकडो बीज विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे पनवेल कर्नाळा ब्रँचच्या एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांना देखील शेकडो आपट्याच्या बीज प्राचार्य कल्पेश भोईर, एन.एस.एस. चे मुख्य समन्वयक चंद्रकांत मुकादम, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास कांबळे, आणि मानसी म्हात्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बीज वाटप करुन हे बीज दसरानिमित्त रोपन करून आपटा रोप निर्मितीचे संकल्प विद्यार्थ्यांनी हाती घेतले. संस्थेमार्फत वरील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना निसर्गमित्र हे सन्मानपत्र देण्यात येणार आहेत.आजच्या उलवे येथील बीजरोपन कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, नवी मुंबई महानगरपालिकेचे अभियंता अशोक पाचपूते, निवृत्त पोलिस अधिकारी दत्तात्रेय भोसले, संस्थेचे मनोहर चवरकर, हर्षद नाईक, संदेश साळूंके, राहूल धमाले, निलेश वातेरे, संतोष शिंदे, वेदांत पाठक, गणेश नागले, सागर ओहाल आदी मान्यवर उपस्थित राहून आपट्याचे बीज वाटप व बीज रोवून दसरा सण साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here