कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयाची दिवाळी आदिवासींसोबत साजरी

0

उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )

दिवाळी हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. हा सण अत्यंत आनंदाने व उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. भारतीय संस्कृतीचा हा त्यांचा महत्त्वाचा ठेवा समजला जातो. पण भारतात अनेक समूहाचे आहेत की ज्यांना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळी सारखा सण अंदाज साजरा करता येत नाही. त्यामुळे कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय दरवर्षी हा सण  आदिवासी बांधवांसमोर साजरा करते व सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करते.

 या अनुषंगाने सोमवार दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य  बळीराम एन. गायकवाड व तसेच  प्रा. के.ऐ. शामा यांच्या मार्गदर्शनाखाली करंजा येथील आदिवासी कातकरी वाडी येथील बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. 

याप्रसंगी प्राचार्य  बळीराम एन. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व समाजाप्रति अस्मिता वाढावी या उद्देशाने तसेच आदिवासी बांधवांनाही हा सण आनंदाने  साजरा करता यावा या हेतूने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे असे सांगितले. अशा उपक्रमातून मोठे आत्मिक समाधान मिळते अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रा.के.ए. शामा यांच्या संकल्पनेतून महाविद्यालय अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत आहे. याप्रसंगी व वाडीवरील महिलांना 10-बारावर 80 सहा वार व 70 पुरुषांना टॉवेल वाटप करण्यात आले. तसेच जवळपास 65 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या घरी तयार केलेला दिवाळी फराळ व गोड पदार्थ आदिवासी बांधवांना दिला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य  बळीराम एन. गायकवाड यांनी रु. 2100, प्रा.के.ए.शामा सर यांनी रु. 10.000, तानाजी घ्यार रु. 5000,  विशाल पाटेकर रु. 6000,  अतुल ठाकूर रु. 2000,  अचल शिंदे रु. 3000, मंगेश म्हात्रे रु. 5000,  तेजस आठवले रु. 2000 व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकूण 13000 अशी आर्थिक मदत केली. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विशाल पाटेकर,  अनिल पवार प्रा.डॉ. दत्ता हिंगमिरे,आय,क्यू. ए.सी. समन्वयक प्रा.डॉ. ए. आर. चव्हाण व राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here